पाटचारी दुरुस्तीसाठी अमळनेरात बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:17 PM2018-06-04T15:17:56+5:302018-06-04T15:20:39+5:30

बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन फापोरे बंधारा पाटचारी दुरुस्तीसाठी प्रा.गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली 100 शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण केले.

Ballagadi Morcha Amalnerat for Patkar Amendment | पाटचारी दुरुस्तीसाठी अमळनेरात बैलगाडी मोर्चा

पाटचारी दुरुस्तीसाठी अमळनेरात बैलगाडी मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देफापोरे ब्रिटिशकालीन बंधारा नादुरुस्तदोन वेळा आंदोलन केल्यानंतरही शासनाचे दुर्लक्षतांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.४ - बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन फापोरे बंधारा पाटचारी दुरुस्तीसाठी प्रा.गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली 100 शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण केले. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य सचिव अधीक्षक अभियंता ओमने यांनी एक महिन्यात प्रकरण मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
फापोरे ब्रिटिशकालीन बंधारा नादुरुस्त झाला आहे. पाटचारी दुरुस्त झाल्यास धार ,मालपूर, अंतुर्ली, रंजाने, अमळनेर या सह १२ गावांचा पाणी प्रश्न मिटून पिण्याचे पाणी गुरांचे पाणी प्रश्न मिटणार आहे. त्यासाठी प्रा.गणेश पवार , राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन पाटील , शिवाजी पाटील यांच्यासह शेतकºयांनी २ वेळा आंदोलन केले होते. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने यांनी अंदाज पत्रक तयार करून तो प्रस्ताव अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठवला होता. मात्र विशेष दुरुस्ती, सुधारणा व दुरुस्ती नूतनीकरण सुधारित मान्यतांचे प्रस्तावाची राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मूल्यार्पण करून घेण्यासाठी नाशिकला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दरम्यान पाटचारीचे काम त्वरित सुरू व्हावे म्हणून प्रा.गणेश पवार, सचिन पाटील, शिवाजी पाटील, मुरलीधर पवार, जितेंद्र पाटील, भटु पाटील यांच्यासह धार मालपूर , अंतुर्ली रंजाने आदी गावांचे १०० शेतकरी बैलजोडीसह धार गावापासून रेल्वे पूल, शिवाजी महाराज पुतळा, जि.प.विश्रामगृह मार्गे काचेरीवर मोर्चा आला. प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर.एस.शिंपी, कालवा निरीक्षक कमलेश दाभाडे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली.

Web Title: Ballagadi Morcha Amalnerat for Patkar Amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.