पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 10:45 PM2024-11-06T22:45:59+5:302024-11-06T22:46:14+5:30

ड्युटीवर असलेल्या जवानाला पाचोरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पोस्टल मतपत्रिका पुरवण्यात आली होती.

Ballot paper went viral, case filed against BSF Jawan | पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल

पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल

श्यामकांत सराफ

पाचोरा (जि.जळगाव)  : पोस्टल मतपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या जवानावर पाचोरा पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   कमलेश हेमराज पाटील,  (रा. तारखेडा, ता. पाचोरा) असे या गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे. त्याला पाचोरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पोस्टल मतपत्रिका पुरवण्यात आली होती. त्यावर त्याने मतदान करून ही मतपत्रिका व्हॉट्सॲपवर प्रसारित केली.

 याप्रकरणी भडगावच्या तहसीलदार शीतल सोलट यांनी कमलेशशी संपर्क साधला. त्यावर त्याने ही मतपत्रिका व्हायरल केल्याचे सांगितले. याप्रकरणी निवडणूक नायब तहसीलदार रणजीत निंबा पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन या जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Ballot paper went viral, case filed against BSF Jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.