जळगावातील बालविश्व गुन्हेगारी विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:32 AM2019-06-02T11:32:06+5:302019-06-02T11:32:56+5:30

दोन वर्षात १०४ बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Balvashvad criminal in Jalgao is known | जळगावातील बालविश्व गुन्हेगारी विळख्यात

जळगावातील बालविश्व गुन्हेगारी विळख्यात

Next

सुनील पाटील
जळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सर्वाधिक गुन्हेगार हे अल्पवयीन असून खून, खुनाचा प्रयत्न, मुलींचे अपहरण, दंगल, प्राणघातक हल्ला, दरोडा, छेडखानी व बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. २०१७ व २०१८ या दोन वर्षात तब्बल १०४ बालगुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरात तर वेगवेगळ्या गृपच्या नावाने अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी टोळ्या तयार केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयात या टोळ्यांनी धुडगूस घातला. गेल्या वर्षभरात शिक्षकांवरही हल्लयाच्या घटना घडल्या आहेत. महिला व तरुणींची छेडखानी, फूस लावून पळवून नेणे, दुसऱ्याला मदत करणे यामध्ये देखील अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग निष्पन्न झाला आहे. शरीराविरुध्दच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे.
२०१७ मध्ये सर्वाधिक गुन्हे
२०१७ या वर्षात अल्पवयीन मुलांवर सर्वाधिक ६० गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल, विनयभंग व बलात्कार या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. ज्या गोष्टी पूर्वी शक्य नव्हत्या, त्या आज मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल तसेच टी.व्ही. याच्यातील वाईट गोष्टींचेच जास्त अनुकरण केले जात आहे. २०१८ मध्ये ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे चोरीचे आहेत.
चोºया व दरोड्यात अट्टल
काही बालगुन्हेगार चोºया, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यात अट्टल आहेत. विशेष म्हणजे उच्च घराण्यातीलही मुलांचा यात सहभाग आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर दरोड्यात ८ तर चोरीमध्ये २१ गुन्हेगार असले तरी रेकॉर्डवर न आलेल्या मुलांची संख्या त्याहूनही अधिक आहे. रिमांड होममध्ये अशाच गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. दरम्यान, कायद्यातील पळवाटांमुळे गुन्हेगारांची संख्या अधिक वाढत चालली आहे. काही नामाकिंत गुन्हेगार हीच संधी साधून गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करीत आहेत. विशेष म्हणजे शिक्षणाच्य वयातच या मुलांनी गुन्हेगारीचे धडे गिरविले असून व्यसनाच्याही आहारी गेलेले आहेत.
बलात्कार, अपहरण अन् छेडखानी
पोलिसांच्या रेकॉर्डला असलेल्या गुन्ह्यांची संख्या चक्रावून टाकणारी आहे. बलात्कार, प्रेमप्रकरण, मुलींना पळवून नेणे व छेडखानी यासारख्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाच सहभाग निष्पन्न झाला आहे. दोन वर्षात ११ अल्पवयीन मुलांवर बलात्कार, छेडखानीचा १४ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातही ४ मुलांचा सहभाग आढळून आला आहे.
मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्याशिवाय आपला मुलगा काय करतो आहे, याकडे पालकांचेही लक्ष नसणे या दोन गोष्टी लहानमुलांना गुन्हेगारीकडे वळण्यात कारणीभूत ठरत आहेत. १६ ते २० या वयोगटातच मुलांना सांभाळणे गरजेचे असून त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. अन्यथा हीच मुले पुढे मोठी गुन्हेगार होतात.
-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील
गुन्हा हा लहान असो की मोठा, शेवटी तो गुन्हाच ठरतो. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. त्यामुळे कमी वयात मुलगा गुन्हेगारीकडे वळला तर त्याला रोखणे अशक्य असते. त्यासाठी पालकांनीच खबरदारी घेऊन मुलांवर लक्ष केंद्रीत करावे. कायदा आपले काम करीत राहणार. पोलिसांमार्फत नेहमीच शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाते.
-डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Balvashvad criminal in Jalgao is known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव