चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने शेतकºयाची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:23 AM2017-08-03T00:23:45+5:302017-08-03T00:30:20+5:30
चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने दुचाकीस्वार शेतकºयाची भंंबेरी उडाल्याची घटना येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने दुचाकीस्वार शेतकºयाची भंंबेरी उडाल्याची घटना येथे घडली.
शहरातील हितेश अशोक पाटील (२५) यांची लोहारा शिवारात शेती आहे. दिवसभर शेतातील कामे आटोपून चार वाजता ते दुचाकीने घराकडे यायला निघाले. १७ किलोमीटरचा प्रवास करून हितेश पाटील हे शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ आले असता उजव्या पायावर काही तरी चढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली वाकून पाहिले तर सापाचे तोंड दिसताच त्यांनी भेदरलेल्या अवस्थेत दुचाकी सोडून तेथून पळ काढला. येणाºया-जाणाºयांनी विचारणा केली असता त्यांनी दुचाकीत साप असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्पमित्रांना बोलवून हा साप काढण्यात आला. धूळनाग असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्याला पकडून सर्पमित्रांनी जंगलात सोडले.