पाटणादेवी येथे नवसफेडीवर बंदी, पर्यावरणदिनापासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:54 PM2018-05-16T13:54:44+5:302018-05-16T13:54:44+5:30

कायदा मोडणा-यांवर गुन्हे दाखल करणार

Ban on food lrogram at Patna Devi | पाटणादेवी येथे नवसफेडीवर बंदी, पर्यावरणदिनापासून अंमलबजावणी

पाटणादेवी येथे नवसफेडीवर बंदी, पर्यावरणदिनापासून अंमलबजावणी

Next
ठळक मुद्देपरिसराचे पर्यावरण दूषितकारवाई करणार

आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. १६ - चाळीसगाव शहरापासून अवघ्या १६ किमी अंतरावर दक्षिणेला असणा-या गौताळा अभयारण्यातील पाटणादेवी मंदिर परिसरात ‘नवसफेडी’वर येत्या पर्यावरणदिनापासून (५ जून) बंदी आणण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.बी. पटवर्धन यांनी दिली. हा निर्णय पाटणादेवी परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्याबरोबरच वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातमाळा डोंगर रांगांच्या पायथ्याशी गौताळा अभयारण्यात पाटणादेवी मंदिर परिसर असून येथे वर्षभर राज्यासह परराज्यातील भाविकांचा राबता असतो. पुरातन हेमाडपंथीय चंडिकेच्या चरणी नवस कबूल करुन तो फेडण्यासाठीही भाविकांची वर्षभर गर्दी असते. यामुळे जंगल परिसरातील पर्यावरणाला हानी पोहचत आहे. वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
एकुण ५ हजार ३५०हेक्टर परिसरात जंगलक्षेत्र असून जैवविविधतेसह दूर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचा येथे अधिवास आहे. डोंगर रांगा, उसळी घेणारे धबधबे, हिरवीगार वनराई, ऐतिहासिक स्थळे अशी समृद्धी या परिसराला लाभल्याले भाविकांसह पर्यटक व वन्यजीव अभ्यासक येथे येतात. नवस फेडण्याच्या प्रथेमुळे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. भाविक त्याची विल्हेवाट लावत नसल्याने परिसराचे पर्यावरण दूषित होत आहे.
तिखट आणि गोड जेवणाचा नैवेद्य दाखवून देवीसमोर नवस फेडला जातो. परिसरातच चुली पेटवून अन्न शिजवले जाते. पत्रवाळ्या, प्लॅस्टिकचे द्रोण, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, उरलेले अन्न परिसरातच पडून असते.
प्लॅस्टिक आणि कुजलेले अन्न खाण्यासाठी जंगली प्राणी येथे येतात. प्ल?स्टीक पोटात गेल्याने प्राण्यांचे मृत्यू ओढावले आहे. भाविकांना याबाबत वनविभागाने सुचना देऊनही उपयोग होत नसल्याने नवसफेडीवर बंदी आणण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
नवसफेडीसाठी बळी देण्यात येणा-या बोकडाची वाजतगाजत देवीच्या मंदिरापर्यंत मिरवणुक काढली जाते. जंगल परिसरात ध्वनिप्रदुषास बंदी असतानाही याचे उल्लंघन केले जाते.
कारवाई करणार
नवसफेडीवर येत्या पाच जून पर्यावरणदिनापासून बंदी करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. याबाबत सद्यस्थितीत वनविभागार्फत भाविकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. पाच जून नंतर मात्र वन्यजीव कायदा १९७२ अन्वये कारवाई करुन गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान वनविभागाच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी उफाळून येण्याची शक्यता काही भाविकांनी बोलून दाखवली आहे.

पाटणादेवी जंगल परिसरात भाविकांकडून होत असलेल्या घाणीबाबत सुचना दिल्या आहेत. वन्यजीवांचा अधिवासाला होऊ पाहणारा धोका आणि पर्यावरणाचा उभा राहिलेला प्रश्न. उपाययोजना म्हणूनच नवसफेड बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंदिर व जंगल परिसराचे सौदर्य वाढून वन्यजीवांची सुरक्षा जपली जाणार आहे.
- एम.बी.पटर्वधन, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, चाळीसगाव.

नवस फेडण्यासाठी दिला जाणारा बोकडबळी, परिसरात होणारा प्ल?स्टीक कचरा ही समस्या आहे. वनविभागाने घेतलेला निर्णय योग्य असून भाविकांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपले पाहिजे.
- बाळकृष्ण जोशी, व्यवस्थापक, पाटणादेवी मंदीर, चाळीसगाव.

Web Title: Ban on food lrogram at Patna Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.