अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:59 PM2019-04-17T14:59:15+5:302019-04-17T15:00:25+5:30

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.

Banal rains in the Kalmswar area of Amalner taluka flooded the banana | अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देसलग तीन दिवस झाले वादळकोट्यवधी रुपयांच्या पिकाचे नुकसानपंचनामे तातडीने करण्याची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. परिणामी पंचनामे करण्याची मागणी होत असून, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.
१४, १५ व १६ एप्रिल रोजी सलग तीन दिवस झालेल्या वादळी वाºयाने कळमसरेसह परिसरात चारा, केळी यांचे नुकसान झाले आहे. यात कळमसरे परिसरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने तोंडाशी आलेला घास या वादळी वाºयाने हिरावला गेल्याने शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. परिणामी झालेल्या नुकसानग्रस्त केळी पिकाचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
कळमसरे येथील ज्ञानेश्वर कोळी या शेतकºयाने त्याच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीत एकच केळी पिकाची लागवड केली होती. वर्षभर केळी पिकाला वेळेवर खत-पाणी, विविध रासायनिक फवारणी यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला होता. मात्र या वादळी वाºयाने झालेला खर्चही निघणार नसल्याने यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. या वादळी पाऊस व वाºयाने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Banal rains in the Kalmswar area of Amalner taluka flooded the banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.