केळीच्या आगारात संशोधन केंद्र उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:31 PM2020-02-18T12:31:17+5:302020-02-18T12:31:50+5:30

कर्मचाऱ्यांची वाणवा, खते, किटकनाशके यावरही होते संशोधन

Banana Agar Research Center neglected | केळीच्या आगारात संशोधन केंद्र उपेक्षित

केळीच्या आगारात संशोधन केंद्र उपेक्षित

googlenewsNext

जळगाव : १९९१ पासून जळगावातील निमखेडी शिवारात सुरू असलेल्या केळी संशोधन केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रयोगशाळेची मागणी प्रलंबितच असून हे संशोधन केंद्र वर्षानुवर्षे केवळ लागवड व काढणीपर्यंतच्या संशोधनापर्यंतच मर्यादीत राहिले आहे़ या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही वाणवा असून केळीच्या आगारातच हे संशोधन केंद्र दुर्लक्षित असल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळणार कसा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे़
महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे केळी संशोधन केंद्र अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ या ठिकाणी पाच एकरावर केळीसंदर्भातील वाणांवर संशोधन केले जाते़ ९३ वाणांचे या ठिकाणी संकलन करण्यात आले आहे़ यासह खते, किटनाशके यांच्याबाबतीतही संशोधन होते़ यातून शेतकºयांना कसा फायदा होईल, आर्थिक दृष्ट्या शेतकरी कसा मजबूत होईल, याबाबत नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग केले जातात. तसेच रोगांवरील उपाय याबाबत प्रयोगद्वारे माहिती संकलीत केली जाते़
साठ वर्षांपासून जिल्ह्यातच केंद्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले हे केळी संशोधन केंद्र अनेक ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन सन १९६१ मध्ये सावदा त्यानंतर सन १९६९ मध्ये यावल व सन १९९१ पासून जळगावात स्थित आहे़ राज्यभरातील केळी लागवडीपैकी जळगावातच ६० ते ७० टक्के लागवड होत असल्याने या ठिकाणीच हे केंद्र आहे़
अचानक कमी केले कर्मचारी...उद्यान विद्यावेत्ता प्रा़ एऩ बी़ शेख, कनिष्ठ मृदरसायन शास्त्रज्ञ प्रा़ ए़ आऱ मेढे, कनिष्ठ वनस्पती रोग निदान शास्त्रज्ञ यांच्यासह आऱ आऱ डोभाळ, एम़ आऱ देशमुख, व्ही़ एस़ लंगाटे हे कर्मचारी सध्या या संशोधन केंद्रात कार्यरत आहेत़ २०१४च्या आधी या केंद्रात पुरेसे मनुष्यबळ होते मात्र, अचानक एके दिवशी ई-मेल वर पत्र येऊन येथील कर्मचाºयांना अन्य विभागांमध्ये हलविण्यात आले़ तेव्हापासून या ठिकाणी पाच ते सहाच कर्मचारी कार्यरत आहेत़
केळीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियांचे संशोधन या केंद्राद्वारे होते़ कुठलेही संशोधन केल्यावर निष्कर्षापर्यंत पोहचत असताना शेतकºयांना आर्थिक फायदा कसा होईल, याचाच विचार अधिक केला जातो़ आदिवासी शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून नंदुरबार जिल्ह्यात योजनाही राबविल्या जात आहे़ केळीवर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे़
-प्रा़ एऩ बी़ शेख, उद्यान विद्यावेत्ता.

Web Title: Banana Agar Research Center neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव