हिमोग्लोबीन वाढीसाठी केळीच्या फुलाचे सुप ठरणार गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:32+5:302021-01-01T04:11:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होत असून, केळीच्या बागेतील केळफूल शेतकरी नेहमी फेकून देत ...

Banana flower soup will be beneficial for hemoglobin growth | हिमोग्लोबीन वाढीसाठी केळीच्या फुलाचे सुप ठरणार गुणकारी

हिमोग्लोबीन वाढीसाठी केळीच्या फुलाचे सुप ठरणार गुणकारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होत असून, केळीच्या बागेतील केळफूल शेतकरी नेहमी फेकून देत असतात. मात्र, नेहमी फेकून देण्यात येणारे केळीचे फुल आरोग्यासाठी गुणकारी असून, यापासून शहरातील डॉ.तेजोमयी भालेराव यांनी इन्स्टंट सुप तयार केले आहे. हे सुप मधुमेहावर अत्यंत गुणकारी असून, यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढीस मदत होणार आहे. नुकतेच भारतीय पेटंट संस्थेने डॉ.भालेराव यांच्या या संशोधनाला पेटंट जाहीर केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून स्त्रीयांमध्ये मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण आहे. केळीचे घड विकसीत होत असताना, केळफुल हे गळून पडते व ते वाया जाते. यामुळे त्या फुलातील अनेक पोषक व औषध मुल्य वाया जात असतात. दक्षिण भारतात या फुलाचा आहारात वापर केला जातो. मात्र, आपल्याकडे या फुलाचा फार काही वापर केला जात नाही. यातील औषधी गुणधर्म ओळखून डॉ.तेजोमयी भालेराव यांनी अनेक महिने अभ्यास केला. केळीच्या फुलापासून सुप तयार केले. या सुपातील विविध घटकांमुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे सुप अत्यंत आरोग्यवर्धक ठरणार आहे.

केळीच्या फुलात असलेले महत्वाचे घटक

जळगाव जिल्ह्यात केळीतील ‘जी ९’ या टीश्यूकल्चरच्या रोपाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. डॉ.भालेराव यांनी या रोपामधील पोषक तत्वांचा अभ्यास केला. यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न व फायबर हे घटक आढळतात. या सर्व घटकांचा उपयोग करून घेण्यासाठी इंन्स्टंट सुपची संकल्पना आल्याची माहिती डॉ.तेजोमयी भालेराव यांनी दिली.

कसे तयार होते सुप

जगभरात अन्नधान्यावरील संशोधनात न्युट्रास्युटीकल (पोषण औषधी) म्हणजेच अन्न आणि औषध यांचा एकत्रित वापर यावर भर दिली जात आहे. त्यानुसारच हे सुप तयार करण्यात येते. केळीच्या फुलाची पावडर तयार करून पौष्टीक आणि औषधी गुणधर्म वाढतील असे घटक वापरून पाण्यात ही पावडर टाकून २ ते ३ मिनीटे उकळून लगेच हे पोषक सुप तयार होते. भारतीय पेटंट संस्थेने देखील या सुपमधील पोषक घटकांचा अभ्यास करून या संशोधनाला पेटंट जाहीर केला आहे. हे पेटंट बनविण्यासाठी डॉ.तेजोमयी भालेराव यांना डॉ.कानन पुराणिक यांनी काम पाहिले.

कोट..

या सुपमध्ये अनेक पोषक घटक आहेत. कुपोषणाचा वाढलेला टक्का, स्त्रीयांमधील मधुमेहाचे प्रमाण यावर हे सुप गुणकारी ठरणार आहे. या सुपमुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होणार आहे.

-डॉ.तेजोमयी भालेराव, संशोधक, जळगाव.

Web Title: Banana flower soup will be beneficial for hemoglobin growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.