भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 04:44 PM2019-04-09T16:44:58+5:302019-04-09T16:46:36+5:30

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Banana from the ground will have to be left to the ground due to the lack of water | भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

Next
ठळक मुद्देरात्रीतून कूपनलिका पडताय कोरड्या तयार माल कापणीकरीता विनवणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. दररोज एक ना एक चालू स्थितीत असलेली कूपनलिका बंद पडत आहे किंबहुना पाण्याचा दाब अचानक कमी होत आहे.
गत तीन वर्षांपासून सतत कमी होत असलेला पावसाळा आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन ठेपला आहे. जसजसा उन्हाचा पारा चढत चालला आहे तसतसा शेतकरी संकटात सापडत चालला आहे. उन्हाच्या तप्त लाटा केळीला मारक ठरत आहेच. परंतु खोडांना कमी पाणी मिळत असल्याने कडक उन्हासमोर तग धरणे कठीण झाले आहे. घडांच्या वजनामुळे खोडं मध्यभागातून आडवे पडत आहेत. यामुळे होणारे नुकसान असह्य झाले आहे तर काही ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूनदेखील पाण्याचा काहीही सहारा लागत नाही. यामुळे केळी सोडायची वेळ अली आहे. आतापर्यंत केळी जगविण्यासाठी झालेला खर्च व आता पाण्याकरिता होणारा पैसा निव्वळ वाया गेला असून, दुहेरी मार बसत आहे.
पाणी पातळी खूप खोल गेली आहे. परिणामी कूपनलिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकच धोका निर्माण झाला आहे. रात्रीतून पाणी अर्धवटच निघण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत किती केळी वाचणार हा कुतूहलाचा विषय ठरणार आहे.
केळी कापणीसाठी शेतकरी रडकुंडीस
भाव द्याल तो द्या, पण केळी कापा, असा निरुत्साही प्रश्न शेतकरी नाइलाजात्सव व्यक्त करत आहे. गेल्या वर्षी अ‍ॅडव्हान्स लागवड केलेल्या शेतकºयांच्या केळी बागेत मालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. मात्र मागणी नसल्याचे कारण दाखवत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन माल खेरेदी करण्याचा फंडा सुरू असून, शेतकºयांना नागवले जात आहे. शेवटी बागेत माल खराब होऊन फेकण्यापेक्षा जो भाव मिळेल तो द्या पण माल कापा, असा टाहो फोडत आहे .
पिलबाग तर नकोच
नवती मालाला उचल जेमतेम असताना पिलबाग तर नकोच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उभे असलेले पिलबाग फेकून देण्यातच धन्यता मानली जाणार आहे. ६ जून २०१८ ला केºहाळेसह परिसरात संपूर्ण महसूल मंडळातील केळी बाग वादळामुळे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी पिलबाग ठेवण्यास पसंती दिली होती. जेणेकरून कमी खर्चात उत्पादन येईल. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता झालेला खर्च निघणे अवघड झाले आहे. परिणामी या पिलबागांचा फटका नवती केळीला बसत आहे .
टरबूज ठरले केळीला अडसर
केळीला पर्याय म्हणून बºयाच शेतकºयांनी टरबूज लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली होती. ती आजही सुरू आहे. त्या मानाने उत्पादनसुद्धा खूप घेतल.े मात्र तेसुद्धा भावाअभावी गाफील ठरले आणि अति प्रमाणात उत्पादन आल्यामुळे केळीच्या मागणीला अडसर ठरले आहे.

Web Title: Banana from the ground will have to be left to the ground due to the lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.