उन्हामुळे केळीची पाने करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:36 PM2017-10-07T18:36:03+5:302017-10-07T18:40:03+5:30
वातावरणातील विषमता ठरतेय रावेर तालुक्यातील केळीसाठी घातक
आॅनलाईन लोकमत
केºहाळे, ता.रावेर,दि.७ : दिवसागणिक वाढणारे उन्हाचे चटके व रात्री थंडीच्या फटाक्याने रावेर तालुक्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. त्यामुळे केळीची पाने करपली असून शेतकºयांचे नुकसान होत आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबर हिट आणि त्यातच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहे. दिवस कडक उन आणि रात्री काहीसा गारवा यामुळे रावेर तालुक्यातील केळीच्या बागेत काही अंतरावरील केळीची खोडांवरील पाने जळू लागल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे.
आतापर्यंत झालेला पावसाळा समाधानकारक असला तरी सद्य स्थितीत केळीवर झालेली निसर्गाची अवकृपा शेतकºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. रात्रीतून अचानक खोंडावरील पाने कुजल्यासारखी (घामाळलेली) होत आहेत. याचा फटका केळीच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरला आहे.