वादळी पावसामुळे केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 12:18 PM2017-06-13T12:18:39+5:302017-06-13T12:18:39+5:30

भुसावळ विभागातील शाळांसह घरांवरील पत्रे उडाली, वीजपुरवठा ठप्प

Banana loss due to windy rain | वादळी पावसामुळे केळीचे नुकसान

वादळी पावसामुळे केळीचे नुकसान

Next

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.13 - भुसावळसह विभागात सोमवारी रात्री वादळी वा:यासह मुसळधार पावसामुळे रावेरसह मुक्ताईनगर पट्टय़ातील केळी आडवी पडली तर भुसावळ तालुक्यातील चोरवड जि़प़शाळांचे पत्रे उडाले तर शहरातील अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांचा संसार उघडय़ावर आला़ वीज तारा तुटल्याने नागरिक रात्रभर अंधारात राहिल्याने प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला़
भुसावळ तालुक्यात शाळांचे पत्रे  उडाले
शहरात रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली़ पावसाच्या प्रारंभी सोसाटय़ाचा वारा वाहण्यास सुरुवात झाली तर नंतर वादळाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील यावल रोडवरील राहुल नगरातील अनेक घरांवरील पत्रे उडाली़ सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही़ गेल्या 24 तासात 5़6 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची केंद्रीय जल आयोगाच्या सूत्रांनी सांगितल़े
भुसावळ शहर पोलीस ठाण्याजवळील झाड उन्मळल्याने कंट्रोल रूमची सेवा प्रभावीत झाली तर तहसीलच्या सेतु सुविधा केंद्राचे कामही ठप्प झाल़े या भागातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आह़े 
भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील जि़प़शाळांचे वादळी वा:याने पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले तर शहरातील अनेक भागातील वीज तारा तुटल्याने मध्यरात्रीर्पयत शहरवासी अंधारात होत़े वादळी वा:यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांचा संसार उघडय़ावर आला़  
रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यात केळीचे नुकसान झाली
वादळी वा:याचा सर्वाधिक फटका रावेर तालुक्यात केळीला बसला़ तालुक्यातील अटवाडे, खानापूर, अजनाडे आदी भागातील बांधावरील केळी वादळी वा:यामुळे आडवी पडल्याने शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल़े शेत-शिवारातील अनेक झाडे आडवी झाली असून रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे चांगलेच झाल़े मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरातही केळी पट्टय़ातही वादळाने केळी आडवी पडल्याने शेतक:यांना मोठा फटका बसला़ 

Web Title: Banana loss due to windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.