रावेर तालुक्यातील कोट्यवधींची केळी बनली पशुंचे खाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 07:28 PM2018-06-17T19:28:03+5:302018-06-17T19:28:03+5:30

रावेर तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांची केळी मातीमोल झाली आहे. बागांमध्ये खोडांवरच गतप्राण झालेली ही केळी वाया जाण्यात जमा असल्याने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी ती गुराढोरांपुढे टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे गाय, बैल, म्हशी यांची चंगळ झाली आहे. एवढेच काय मेंढपाळांनी या अकाली सुगीचा लाभ उचलत आपल्या शेळ्या मेंढ्यांना खाद्य म्हणून केळीचे घड टाकणे सुरू केले आहे.

 Banana made of crood of bananas in Raver taluka | रावेर तालुक्यातील कोट्यवधींची केळी बनली पशुंचे खाद्य

रावेर तालुक्यातील कोट्यवधींची केळी बनली पशुंचे खाद्य

Next
ठळक मुद्देसुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणेराज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर, दि.१७ : तालुक्यात गेल्या पंधरवड्यात वादळी पावसामुळे जमीनदोस्त होऊन मातीमोल बनलेल्या केळीचा आता चक्क पशुंचे खाद्य म्हणून वापर होत असून हतबल झालेल्या केळी उत्पादकांना हे दुर्दैवी चित्र आपल्या डोळ्यासमोर पहावे लागत आहे.
दरम्यान, शासकीय मदतीच्या अपेक्षेने बहुसंख्य केळी उत्पादकांनी आपल्या बागातील उद्ध्वस्त केळीचे खोड तसेच ठेवले असून पंधरा दिवस उलटून गेले तरी मदतीची काहीही घोषणा नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांच्या अस्वस्थेत भर पडली आहे.
ंअसा खर्च आणि असे नुकसान
तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी वादळी वारे व गारपिटीने जमीनदोस्त झाली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचा सरासरी हिशोब धरला तर केळीच्या प्रतिखोडामागे किमान १०० रूपये प्रमाणे खर्च झाला आहे. अशा ९० लाख केळी खोडांमागे ९० कोटी रुपयांचा उत्पादन खर्च व २० किलोच्या रासप्रमाणे ८५ टक्के उत्पादनाची सरासरी धरली तर १५ लाख ३० हजार क्विंटल केळीमाल मातीमोल झाल्याने सरासरी २ अब्ज २७ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु शेतकºयांनी यंदाच्या केळी उत्पन्नातून पाहिलेले हिरवे स्वप्न थेट मेंढ्या, बकºया व गुरांच्या घशात जात असल्याने व राज्यकर्त्यांकडून उत्पादकांच्या हाती भोपळा दिला जात असल्याचे पाहून शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.

Web Title:  Banana made of crood of bananas in Raver taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.