रावेर तालुक्यातील तांदलवाडी पाठोपाठ अटवाड्यातूनही केळी निर्यात केंद्रास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:13 AM2019-04-08T01:13:29+5:302019-04-08T01:14:48+5:30

क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत.

Banana plantation center in Raver taluka will be followed by banwali export center | रावेर तालुक्यातील तांदलवाडी पाठोपाठ अटवाड्यातूनही केळी निर्यात केंद्रास प्रारंभ

रावेर तालुक्यातील तांदलवाडी पाठोपाठ अटवाड्यातूनही केळी निर्यात केंद्रास प्रारंभ

Next
ठळक मुद्देरावेरच्या दक्षिणेतून पूर्वेकडे वाहू लागले केळी निर्यातीचे वारेविशाल रामेश्वर अग्रवाल यांचा कृषीसेवाभावाचा वारसा

रावेर, जि.जळगाव : क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत. तालुक्याचा कर्जोद, वाघोड, खानापूर, निरूळ व चोरवड भाग म्हणजे चंद्रावरील काळ्या खाचखळग्यांसारखा समृद्धीला लाजवणारा वाळवंट होऊ पाहत असताना मात्र लगतच्या तापी काठावरील अटवाडे गावात केळी निर्यात केंद्राचा शनिवारी प्रारंभ झाल्याने केळी उत्पादकांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.
रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावशिवारातील तरूण शेतकऱ्यांनी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड करीत स्वंयचलीत यंत्राद्वारे विद्राव्य खतांचे फर्टिगेशन तथा फळ निगा तंत्रज्ञानासह केळीचे काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान अवलंबून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाचे केंद्र ठरले आहे. किंबहुना या पारंपरिक शेतीची कात टाकून व्यावसायिक शेतीची कास धरणाऱ्या उद्यमशील शेतकऱ्यांनी तांदलवाडी गावाला केळी निर्यात केंद्राची ओळख निर्माण करून दिली.
त्या पावलावर पाऊल ठेवत अटवाडे येथील विशाल रामेश्वर अग्रवाल या आॅटोमोबाईल इंजिनीअर असलेल्या युवा शेतकºयाने आपल्या दातृत्वशील आजोबा शंकरलाल अग्रवाल यांच्या कृषीसेवाभावाचा वारसा पुढे चालवत, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीचे गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाला सुरूवात केली. जळगाव येथील निर्यातक्षम केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी निर्यातक्षम केळीचे जैन इरिगेशन द्वारा अरब राष्ट्रांत निर्यात केली. मात्र, तांदलवाडीप्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागातील या वाळवंटात केळी निर्यात केंद्र फुलावे अशी अभिलाषा बाळगून विशाल अग्रवाल यांनी आजपासून ऋची निर्यात केंद्राची स्थापना करून स्वत:च्या शेतातील गुणात्मक दर्जाची निर्यातक्षम केळीची पॅकेजींग प्रक्रिया पूर्ण करून ओमान या अरब राष्ट्रात नियार्तीला शुभारंभ केला. मुंबई तथा गुजरात मध्ये मुख्यालय असलेल्या देसाई फ्रुट या मध्यस्थ कंपनीद्वारा निर्यातीला शुभारंभ केला आहे. यावेळी माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील, सरपंच गणेश महाजन, उपसरपंच चंद्रकात पाटील, संतोष पाटील, भास्कर कुयटे, नितीन पाटील, रामेश्वर अग्रवाल, वरूण अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. दररोज २० टन निर्यातक्षम केळी सतत चार ते पाच दिवस सावदा येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये निर्यात करण्यासाठी साठवून व तपमान नियंत्रीत करून कंटेनरने मुंबई जेएनपीटी बंदरावरून ओमान या आखाती राष्ट्रात तब्बल २१ दिवसांनी पोहोचणार आहे.

सद्य:स्थितीत खानापूर पंचक्रोशीतील निर्यातक्षम केळी उत्पादकांची केळी तात्पुरत्या स्वरूपात शेतातचं पॅकेजिंगची प्रक्रिया करून देसाई फ्रुट कंपनीची एजन्सी घेऊन ही केळी निर्यात केली जाणार आहे. आॅक्टोबरपासून पॅकेजिंग हाऊस उभारून ऋची निर्यात केंद्राला मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न राहील.
-विशाल अग्रवाल, अटवाडे, ता.रावेर

Web Title: Banana plantation center in Raver taluka will be followed by banwali export center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.