दोन दिवसात केळी दरात 112 रुपयांची घसरण
By admin | Published: March 26, 2017 03:40 PM2017-03-26T15:40:07+5:302017-03-26T15:40:07+5:30
दोनच दिवसात केळीच्या दरात क्विंटलमागे 112 रुपयांची घसरण झाली आहे.
Next
आंध्रप्रदेशातून आवक वाढली : उन्हाचा तडाखा वाढल्याने घसरण कायम राहणार
जळगाव, दि.26 : आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातून केळीची मोठय़ा प्रमाणात झालेली आवक आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने दोनच दिवसात केळीच्या दरात क्विंटलमागे 112 रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमान व उन्हाळी फळाची आवक यामुळे दरातील घसरण आगामी काळात कायम राहणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
बनाना सिटी म्हणून ओळखल्या जाणा:या जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, भुसावळ या भागात सर्वाधिक केळीचे उत्पन्न घेतले जाते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आंध्रप्रदेशातून उच्च प्रतीच्या केळीची मोठय़ा प्रमाणात आवक सुरु झाली आहे. त्यामुळे जळगाव व ब:हाणपूर जिल्ह्यातील केळीच्या दरात अचानक घसरण सुरु झाली आहे. दोनच दिवसात केळीच्या दरात प्रति क्विंटल 112 रुपयांची घसरण झाली आहे.
सलग 85 दिवस भाव टिकून
यावर्षी नवतीच्या केळीची कापणी कमी असल्याने जानेवारी ते आजर्पयत केळीचे भाव टिकून होते. कांदे बागातील देखील केळीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. सलग 85 दिवस भाव टिकून राहणे हे जळगाव जिल्ह्यातील केळी भावाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण बाब आहे.
केळी दरात घसरण कायम राहणार
जळगावात मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा बसत असतो. एप्रिल व मे महिन्यात तापमान 45 डिग्री सेल्सीअसर्पयत पोहचते. या काळात केळीची काढणी झाल्यानंतर ती परिपक्व होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आगामी काळात देखील केळीच्या दरात घसरण कायम राहणार आहे.
उन्हाळी फळांची आवक वाढली
सध्या बाजारात टरबूज, डांगर, द्राक्ष, संत्रा व काही प्रमाणात आंबा या फळाची आवक वाढली आहे. हंगामी फळांचे भाव देखील ग्राहकांच्या आवाक्यात असल्याने केळी ऐवजी ग्राहक ही फळे खरेदी करीत असतो. त्यामुळे केळीच्या मागणीला काही प्रमाणात फटका आहे.
केळीचे असे आहेत दर
केळीचा 23 रोजी प्रति क्विंटल 1582 रुपये भाव होता. त्यात 1450 भाव आणि 22 रुपये फरक होता. मात्र रविवारी केळीचा प्रति क्विंटल 1470 भाव होता. त्यात 1350 भाव व 20 रुपये फरक होता. ब:हाणपूरच्या बाजारात केळीचा भाव हा 751 ते 1607 दरम्यान प्रतिक्विंटल भाव होता.