15 दिवसात केळी दरात 300 ने वाढ
By admin | Published: January 19, 2017 12:23 AM2017-01-19T00:23:02+5:302017-01-19T00:23:02+5:30
आवक घटली : उत्तरेकडून मागणी कायम
जळगाव : कांदेबाग व पिलबाग केळीच्या दरात मागील पंधरवडय़ामध्ये क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या थंडीमुळे केळी परिपक्व होण्यास अधिक कालावधी लागत असल्याने केळीचा बाजारातील पुरवठा जवळपास 30 टक्क्यांनी घटला आहे. तर उत्तर भारतासह मुंबई, ठाणे येथील बाजारपेठेची मागणी मात्र कायम असल्याने ही दरवाढ झाली आहे.
मुंबई, स्थानिक, ठाणे येथील बाजारपेठेमध्ये जिल्ह्यात उत्पादित होणा:या 70 टक्के केळीचा पुरवठा केला जातो. तर उर्वरित केळीचा पुरवठा विदर्भ, उत्तरेकडील राज्यांमध्ये होतो.
30 ते 35 दिवसांचा कालावधीही परिपक्वतेस अपुरा
सध्या केळी परिपक्व होण्यास 30 ते 35 दिवसांचा कालावधी लागत आहे. एरवी किमान 17 ते 20 अंश सेल्सिअस तापमानात 18 ते 20 दिवसांमध्ये केळी परिपक्व होते. मागील दोन-तीन आठवडे थंडी अधिक होती.
अर्थातच मागणी कायम व पुरवठा कमी यामुळे केळीचे दर वाढत आहेत.
कांदेबाग लागवडीचे प्रमाण यावल, रावेर भागात अत्यल्प आहे. जळगाव व चोपडा तालुक्यातील तापी, अनेर नदीच्या पट्टय़ात केळीची लागवड केली जाते. अर्थातच केळीचे उत्पादनही सध्या कमी असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
5 जानेवारीपूर्वी कांदेबाग व पिलबाग केळीचे दर क्विंटलमागे 800 रुपयांर्पयत होते. जवळपास आठवडाभर दर स्थिर होते. नंतर दरवाढ व्हायला लागली. 800 वरून 850, 900, 950 अशी दिवसागणिक दरवाढ झाली.
मागील काही दिवसांमधील केळीचे दर
(दर प्रती क्विंटल व रुपयात)
14 जानेवारी 1000
15 जानेवारी 1050
16 जानेवारी 1050
17 जानेवारी 1080
18 जानेवारी 1110