दिल्ली गाठताच केळीचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 08:47 PM2021-02-07T20:47:13+5:302021-02-07T20:47:20+5:30

सावदा येथून रेल्वेच्या  ४२ वॅगन्सद्वारे ९६६० क्विंटल केळी झाली रवाना 

Banana prices went up as soon as we reached Delhi | दिल्ली गाठताच केळीचे दर वधारले

दिल्ली गाठताच केळीचे दर वधारले

Next

राजेंद्र भारंबे
सावदा, ता. रावेर :  तब्बल ६ वर्षांनी प्रथमच रेल्वेचे इंडियन रॅक केळी घेऊन येथील रेल्वे स्थानकावरून रविवारी रवाना झाले. येथून ७  रोजी ४२  वॅगन्सद्वारे सुमारे नऊ हजार ६६०  क्विंटल केळी दिल्ली येथील आजादपूर मंडीला  पाठविली आहे. त्यामुळे केळीच्या भावामध्ये एका रात्रीत तब्बल शंभर ते दीडशे रुपये वाढ झाली आहे. या वाहतूक व्यवस्थेमुळे केळी भावात अजून वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे
केळी वॅगन्स भरताना प्रवीणकुमार धिंगरा, किशोर पाटील,डी.के. महाजन, वसंत पाटील,राहुल पाटील, बाळू पाटील, महेश लेखवानी, मुकेश लेखवानी, कुंदन सुपे, सोनू मंगानी, कडू चैाधरी, किशोर गणवानी, भरत सुपे यांचेसह अनेक  शेतकरी उपस्थित   होते.
कोरोना काळात आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाने इच्छित स्थळी फळे भाजीपाला वाहून देण्यासाठी रेल्वे विभागाद्वारे किसान रेल योजना अमलात आणली आहे.  या योजनेच्या माध्यमातून देशातील फळे व भाजीपाला रेल्वेच्या माध्यमातून माफक दरात मोठ्या शहरात पोहोचविण्यात येत आहे. मात्र पुरेशा वॅगन उपलब्ध होत नव्हत्या याबाबत नाराजी होती. व पुरेशा वॅगन्स उपलब्ध कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. 
याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.  याची दखल घेत सावदा येथून २०१४  सालापासून बंद पडलेली इंडियन रॅकद्वारे होणारी केळी वाहतूक पुन्हा व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्सद्वारे ७ जानेवारीपासून  रेल्वे विभाग, शेतकरी व व्यापारी यांच्या त्रिसूत्री मताने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.
 

Web Title: Banana prices went up as soon as we reached Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.