केळी उत्पादक शेतक:यांचा सानिया कादरी यांच्या बंगल्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:14 PM2017-09-19T18:14:59+5:302017-09-19T18:19:56+5:30

केळी खरेदी करीत पैसे न दिल्याने शेतक:यांनी फोडल्या बंगल्याच्या काचा. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 14 शेतक:यांना घेतले ताब्यात

Banana Produce Farmer: Sania Qadri's Bungalow Attack | केळी उत्पादक शेतक:यांचा सानिया कादरी यांच्या बंगल्यावर हल्ला

केळी उत्पादक शेतक:यांचा सानिया कादरी यांच्या बंगल्यावर हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देकेळी उत्पादकांच्या रकमेची फसवणूक केल्याने शेतकरी संतप्तशंभर ते दीडशे महिलांचा जमावाने केला हल्लापोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला

ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.19 -  भुसावळातील बांधकाम व्यावसायिक सानिया कादरी यांनी शेतक:यांकडून केळी खरेदी केली मात्र त्यापोटी पैसे न देता फसवणुक केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मंगळवारी दुपारी 12.30 वाजता  सानिया कादरी यांच्या शहरातील जामनेररोडवरील बंगल्यावर  संतप्त महिला व पुरुष शेतक:यांनी हल्ला केला. शेतक:यांनी कादरी यांच्या बंगल्याची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 14 शेतक:यांना ताब्यात घेतले आहे.
सानिया कादरी यांनी गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात  रावेर आणि यावल व तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यासोबत  केळी खरेदी-विक्रीचा  व्यवसाय केला. त्यातच त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम वाढत गेली.


मंगळवारी  शंभर दीडशे शेतक:यांनी महिलांसह  दुपारी  बारा वाजेच्या सुमारास सानिया कादरी यांचा  जामनेर रोडवरील बंगला गाठला. संतप्त शेतकरी आणि त्यांच्या सोबतच्या महिलांनी सानिया कादरी यांच्या बंगल्यावर हल्ला केला. त्यावेळी  त्यांची  आई सय्यद अफसाना व लहान बहीण रिया कादरी प्रचंड खाबरल्या होत्या. त्यांनी आरडा ओरड करुन मदत मागितली. बंगल्याच्या दुस:या बाजुला त्यांनी खोलीमध्ये स्वत:ला कोंडून ठेवले होते.

हल्ला झाला त्यावेळी सानिया कादरी घरात नव्हत्या, असे सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी 14 शेतक:यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Web Title: Banana Produce Farmer: Sania Qadri's Bungalow Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.