जळगावात राष्टÑवादीने फेकली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर केळी, आंदोलनाला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:03 PM2018-06-19T18:03:51+5:302018-06-19T18:03:51+5:30

पोलिसांकडून बळाचा वापर

Banana throw on the office of Water Resources Minister | जळगावात राष्टÑवादीने फेकली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर केळी, आंदोलनाला गालबोट

जळगावात राष्टÑवादीने फेकली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर केळी, आंदोलनाला गालबोट

Next
ठळक मुद्देमाजी पालकमंत्र्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीलोटालोटीत कुणाची चप्पल तर कुणाचा मोबाईल हरवला

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादकांना वादळ व गारपिटीची नुकसान भरपाई शासनामार्फत मिळण्यासाठी शिवतीर्थ मैदान चौकात (कोर्ट चौकात) आयोजित निषेध व केळीफेक आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ मैदानासमोरच असलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर केळी फेकल्याने तसेच विनापरवानगी भर चौकात रस्त्यावर सभा घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांसह राष्टÑवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही झाली.
मध्यप्रदेशात भाजपाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण शेतीची स्वत: पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकºयांना जागेवरच मदत जाहीर करतात आणि महाराष्ट्र राज्यातही भाजपाचेच सरकार असून पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री व कृषीमंत्री तसेच प्रभारी मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील हे पाहणीस तर आले नाही परंतु मदतीच्या समितीचे महत्त्वाची तीन खाती त्यांच्याकडे असल्यावर सुद्धा अद्याप १९ दिवसांत कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. दरम्यान भाजपाचे शिष्टमंडळ राज्यात व केंद्रात भेटल्यावर सुद्धा मदत न मिळाल्यामुळे शेतकºयांचा सरकारवर रोष व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव धोंडगे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्टÑवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड.रविंद्र पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार आदींच्या नेतृत्वाखाली सोमवार, १९ जून रोजी दुपारी दीड वाजता शिवतीर्थ मैदान चौकात सरकार विरोधात रोष व निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. तसेच काहीदिवसांपूर्वी जिल्ह्यात केळीच्या नुकसानीची पाहणी करणाºया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दौºयातराष्टÑवादी किसान सभेचे सोपान पाटील यांनी पालकमंत्री का पाहणीसाठी आले नाहीत? याचा जाब विचारल्याने त्यांना धक्काबुक्की झाल्याच्या वादाची पार्श्वभूमीही या आंदोलनाला होती. त्यासाठीच हे आंदोलन गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते.
शिवतीर्थ मैदानापासून आंदोलनाला सुरूवात
शिवतीर्थ मैदानाजवळील चौकात कृषक भवनजवळ दुपारी १ वाजेपासूनच राष्टÑवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी जमायला सुरूवात झाली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत शिवतीर्थ मैदानात शिरले. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुसºया बाजूला या मैदानाचे प्रवेश असल्याने तेथे केळीचे घड भरलेले ट्रॅक्टर आधीच उभे केलेले होते. पदाधिकारी शिवपुतळ्याचे पूजन करून येईपर्यंत कार्यकर्त्यांनी हे ट्रॅक्टर रस्त्यावर आणत महाजन यांच्याकार्यालयासमोर रस्ता दुभाजकाजवळ ट्रॅक्टरमधील केळी ओतून दिली.
माजी पालकमंत्र्यांसह पदाधिकाºयांना धक्काबुक्की
महाजन यांच्या कार्यालयापासून या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हटविल्यानंतर ते सगळे पुन्हा भारत कृषक भवन समोरील रस्त्यावर सावलीत जमले. तेथे रस्त्यावरच कापडी पट्ट्या टाकून रस्ता अडवून छोटेखानी सभा घेण्याची तयारी सुरू झाली. माजी पालकमंत्री देवकर मार्गदर्शन करीत असतानाच डीवायएसपी सचिन सांगळे, तसेच अधिकारी व कर्मचारी धावतच तेथे आले. डीवायएसपी सांगळे यांनी आक्रमक भूमिका घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले. ते एवढे आक्रमक होते की, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना छातीला हात लावून पाठीमागे ढकलले. तसेच इतर अधिकारी, कर्मचाºयांनी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव धोंडगे, जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, अ‍ॅड.रविंद्र पाटील आदींना धक्काबुक्की केली. त्यामुळे कार्यकर्ते चिडले. अखेर पदाधिकारी व सांगळे यांच्यात चर्चा होऊन रस्त्याची जास्त जागा न अडविता पाच मिनिटांत धोंडगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

Web Title: Banana throw on the office of Water Resources Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.