केळीच्या एका झाडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:50+5:302021-08-14T04:20:50+5:30
फोटो रावेर, जि. जळगाव : केळीच्या एकाच झाडाला दोन घडांची निसवण झाली आहे. निसर्गचक्रातील ही एक वेगळी घटना ...
फोटो
रावेर, जि. जळगाव : केळीच्या एकाच झाडाला दोन घडांची निसवण झाली आहे. निसर्गचक्रातील ही एक वेगळी घटना असल्याचे सांगितले जात आहे.
रावेर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील शेतकरी विजय त्र्यंबक बढे यांनी टिश्यू कल्चरच्या पाच हजार रोपांची लागवड केलेली आहे. त्यात एका झाडावर निसर्गाचा अद्भुत चमत्कार आढळून आला. एका झाडाला तब्बल दोन केळीच्या घडांची निसवण झाली आहे.
एका झाडाला दोन घडांची निसवण ही निसर्गचक्रातील दुर्मीळ गोष्ट आहे. दोन्ही घड हे अतिशय उत्तम प्रकारे पोसले जात आहे. अशी दुर्मीळ झाडे जर जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना दुहेरी हंगाम मिळणे नाकारता येत नाही. यामुळे केळीसाठी अत्यंत चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी विजय बढे यांचा मुलगा जय बढे यांनी सांगितले.