रावेरनजीक केळीने भरलेला ट्रक उलटला, पुनखेडामार्गे बसफेऱ्या खंडीत झाल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:44 PM2020-02-20T12:44:21+5:302020-02-20T12:44:43+5:30
रावेर - मुक्ताईनगर मार्गावर वाहतूक ठप्प
रावेर, जि. जळगाव : जळगावहून पंजाबमधील जालंधर येथे केळीने भरलेला अवजड ट्रक (क्र. पी.बी.- १०, डी.एम. ९२०४) रावेर-मुक्ताईनगर मार्गावरील पुनखेडा नादुरूस्त पुलावरून उलटल्याने चालक जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
भोकर नदीतील पर्यायी रस्त्यावरून रहदारी ठप्प झाल्याने इयत्ता बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे बस सेवेअभावी हाल झाले.
जळगाव येथून एका केळी उत्पादक शेतकºयाची केळी ट्रकमध्ये भरून पंजाबमधील जालंधर येथे भरून नेत असताना रावेर ते पुनखेडा दरम्यान नादुरूस्त अवस्थेतील भोकर नदीतील पर्यायी रस्त्यावरून नादुरूस्त पुनखेडा पुलावर चढवत असताना ऐन चढावाच्या अंतिम टोकावरच अचानक ट्रकचा गियर न्युट्रल होवून व ब्रेकही निकामी होवून अवजड वजनाच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. सदरचा ट्रक उताराने एका बाजूला उंचावर चढल्याने पलटी होवून चालक रणजीत राणा जखमी झाले. क्लिनर शेख शहजादे यांनी जखमी चालकास कॅबीन उघडून बाहेर काढले.
रावेर व मुक्ताईनगर आगारातून सुटणाºया एस.टी. बसेसची वाहतूक याच भोकर नदीपात्रातील पर्यायी रस्त्यावरून सुरू असल्याने बुधवारी उलटलेल्या ट्रकमुुळे गुरूवारी सकाळपासून सदरची बस वाहतूक पुनखेडामार्गे खंडीत झाली होती. परिणामी पुनखेडा येथील बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे बस सेवेअभावी कमालीचे हाल झाले .