१०५ गावांमध्ये साडेतीन हजार हेक्टरमधील केळी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:20 PM2020-09-18T19:20:34+5:302020-09-18T19:21:19+5:30

कुक्कुंबर मोझॅक व्हायरस : ६३ कोटी रुपयांचे नुकसान, अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर

Bananas affected in three and a half thousand hectares in 105 villages | १०५ गावांमध्ये साडेतीन हजार हेक्टरमधील केळी बाधित

१०५ गावांमध्ये साडेतीन हजार हेक्टरमधील केळी बाधित

Next


रावेर : खरीपाच्या पीकावरील व तणांवरील रसशोषक किडींद्वारे तालुक्यातील १०५ गावातील ६ हजार ७३२ शेतकऱ्यांच्या ३ हजार ५११. ३६ हेक्टर क्षेत्रातील लागवडीखालील असलेल्या केळीबागा कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने बाधित झाल्याबाबत नुकसानीच्या पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व प्रभारी तालूका कृषी अधिकारी एम. जी. भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
रावेर तालुक्यातील विवरे बु. येथील केळीबागेत जुलै महिन्यात सात खोडांवर कुक्कुंबर मोझॅक व्हायरसच्या विषाणूजन्य रोगाने घातलेला हैदोस पाहता गत दोन तीन महिन्यांत या रोगाने सबंध तालुक्याला विळखा घातला आहे. सततचा झिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण व सुर्यदर्शनाचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीत खरीपाच्या पीकावरील व तणांवरील रसशोषक किडींद्वारे प्रादुर्भाव होणाºया कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालूक्यातील लोहारा शिवारातील ३३७ शेतकऱ्यांच्या २०९. १७ हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक या व्हायरसने हैदोस घातला असून त्या खालोखाल ऐनपूर शिवारातील २१४ शेतकºयांच्या १४६.५५ हेक्टर क्षेत्रात तर रावेर शिवारातील २०१ शेतकºयांच्या १३३.४५ हेक्टर क्षेत्र, केºहाळे बु।। शिवारातील १८७ शेतकºयांच्या १०३.१९ हेक्टर क्षेत्रात, अहिरवाडी, खिरवड, विवरे बु ।।, विवरे खुर्द, पाडळे, रेंभोटा, मंगरूळ शिवारात सर्वाधिक केळीबागा उद्ध्वस्त झाल्याचे पंचनाम्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालुक्यातील १०५ गावातील गत तीन ते चार महिन्यांपासून नवीन लागवडीखालील असलेल्या ७ हजार ५५७.२२ हेक्टर क्षेत्रापैकी दोन हेक्टर अल्पभूधारक असलेल्या ६ हजार ४१४ शेतकºयांच्या ३ हजार १४१.९३ हेक्टर क्षेत्रातील तर २ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात लागवड केलेल्या ३१८ शेतकºयांच्या ३६९.७३ हेक्टर क्षेत्रातील अशा एकूण ६ हजार ७३२ शेतकºयांच्या ३ हजार ५११.३६ हेक्टर क्षेत्रातील ४६. ४६ टक्के केळी बागांचे कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने नुकसान झाल्याचा पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व प्रभारी तालूका कृषी अधिकारी एम जी भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे नुकताच सादर केला आहे.
नुकसान भरापाई अत्यल्प
शासन निर्धारित खरीप, बागायत व फळबागायत पीकांच्या शेतीनुकसानीच्या भरपाईसाठी घोषित केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सीएमव्हीने बाधित झालेल्या केळी बागायतीला १३ हजार ५०० रूपये सानुग्रह अनुदानातून कमाल दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली. केळी उत्पादक शेतकºयांना किमान २५ ते ४० रूपये गत चार ते पाच महिन्यांपासून लागवड केलेल्या प्रतिखोडावर खर्च अर्थात प्रतिहेक्टरी १ लाख ८० हजार रूपये खर्च झाल्याने केळी उत्पादकांचे निव्वळ लागवडीखालील केळी पीकाकरीता आर्थिक नुकसान झाले आहे. या रोगामुळे चालू खरीप वा बागायती हंगाम बुडून झालेली अपरिचित हानी शासनाची डोळे दिपवून टाकणारी ठरेल. किंबहुना, शासनातर्फ़े घोषित केलेल्या प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रू नुकसान भरपाईपोटी प्रतिखोडाला केवळ तीन रूपये शेतकर्ºयांच्या पदरात पडणार असल्याने शेतकºयांची ती एक प्रकारची थट्टा केली जाणार असल्याचे संतप्त भावना शेतकरीवगार्तून व्यक्त होत आहेत. एकंदरीत २५ ते ४० रू खर्च केलेल्या शेतकºयांच्या पदरात तीन रुपयेच पडणार आहेत.

Web Title: Bananas affected in three and a half thousand hectares in 105 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.