कजगाव परिसरातील केळीला मिळतेय गतवैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:20+5:302021-06-28T04:12:20+5:30
कजगाव, ता. भडगाव : इंग्रजाच्या काळापासून कजगावची केळी प्रसिद्ध होती, म्हणूनच ती देशात प्रसिद्ध झाली. त्याचमुळे ती दिल्लीसह देशातील ...
कजगाव, ता. भडगाव : इंग्रजाच्या काळापासून कजगावची केळी प्रसिद्ध होती, म्हणूनच ती देशात प्रसिद्ध झाली. त्याचमुळे ती दिल्लीसह देशातील प्रमुख शहराच्या धक्क्यावर पोहचण्या अगोदरच विकली जात होती. या केळीच्या चवीला डॉ. कुरियन यांच्या ‘मदर डेअरी’नेदेखील पसंत केले. आता ही केळी सात समुद्रापार जाऊ लागल्याने कजगाव परिसरतील केळीला गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे.
या गोड केळीच्या गोडव्याची चर्चा देशभर पसरली नी या केळीला देशभरातून मागणी येऊ लागली. कजगावची केळी भारतातील प्रमुख शहरात पोहचू लागली. प्रसिद्ध झालेली केळी ही प्रमुख शहरांच्या धक्क्यावर पोहचण्याअगोदरच तिची विक्री होऊ लागल्याने तिच्या गोडव्याची चर्चा सर्वत्र झाली. आता तर ही केळी साता समुद्रापार जाऊ लागली आहे.
या गोडव्याची भनक दिल्लीच्या डॉ. कुरियन यांच्या मदर डेअरीलादेखील लागली नी कजगावची केळी मदर डेअरीलादेखील भावली. यामुळे या डेअरीच्या विक्री केंद्रावरून नामांकित लोकापर्यंत ही केळी पोहचली. मदर डेअरीने कजगावची केळी खरेदी सुरू केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले भाव मिळू लागले.
गेल्या पाच-सहा वर्षांत पाऊस कमी झाल्यामुळे बागायत विहिरीच्या जल पातळीही खोल गेल्याने कजगाव परिसरातील केळी लोप पाऊ लागली. यामुळे केळीची बाजारपेठ ओस पडू लागली. केळी लागवड कमी झाल्याने केळी उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळू लागले. त्यामुळे कजगावचा केळी माल बंद पडला. कजगाव येथून रेल्वे वॅगन भरण्याचे कामही बंद झाले.
गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे बागायत विहिरींच्या जलपातळी वाढली. कजगाव केळी लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्याने केळीला गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे. कजगावच्या केळीचा गोडवा अगोदर देशात होता, तो आता सातासमुद्रापार पोहोचल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
केळीची देखभाल लयभारी
कजगाव परिसरात केळी खरेदीसाठी बाहेरच्या काही फ्रुट कंपन्या दाखल झाल्या आहेत. परिसरात फिरून क्वॉलिटीची केळी खरेदी करून ती विशिष्ट पद्धतीने बॉक्स पॅकिंग करून नाशिक येथून वातानुकूलित कंटेनरने मुंबई व तेथून इराण, अफगाणिस्तान, इराक या देशात पाठविली जात आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक फणी बुरशीनाशक व नंतर साध्या पाण्याने धुऊन ती व्हॅक्युमने हवा बंद करून १३, १४ १ ६ किलो अशा वेगवेगळ्या खोक्यात पॅक करून ट्रकमध्ये भरतात. साधारण ६५० ते ७५० खोके हे एका ट्रकमध्ये भरून ते नाशिक येथे पाठवतात. त्या ठिकाणी कोल्डस्टोरेजमध्ये उतरवल्यानंतर ते वातानुकूलित कंटेनरने मुंबई पाठविले जाते.
यावर्षी कजगाव पट्ट्यातील केळी सातासमुद्रापार जात असल्याने मोठे समाधान होत आहे. बरोबरच दोन ते तीनशे रुपयांचा भावदेखील जास्त मिळत असल्याने केळी उत्पादकाचे उत्पन्न वाढणार आहे.
-अरुण पंडितराव पाटील, केळी उत्पादक शेतकरी, नेरी, ता. पाचोरा
बुरशीनाशक व साध्या पाण्यात स्वच्छ करतांना मजूर.
===Photopath===
270621\156-img-20210625-wa0030.jpg
===Caption===
१)केळी ला बुरशीनाशक व स्वच्छ पाण्यात धोतांना मजुर
२)बॉक्स मध्ये केळीच्या फनी पॅकिंग करतांना
३)व्हॅक्यूम ने हवाबंद करत पॅकींग करतांना
४)अरुण पंडितराव पाटील
केळी उत्पादक