लोकसहभागातून तयार केलेला बंधारा वाळू माफियांनी तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:42 PM2019-04-26T12:42:00+5:302019-04-26T12:42:28+5:30

ग्रामस्थांनी अडवले ४० ट्रॅक्टर

The Bandra sand mafican broke the band created from the people | लोकसहभागातून तयार केलेला बंधारा वाळू माफियांनी तोडला

लोकसहभागातून तयार केलेला बंधारा वाळू माफियांनी तोडला

Next

जळगाव : गिरणा नदीपात्रातून अवैध उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी आव्हाणे ग्रामस्थांनी लोकसहभागातून तयार केलेला मातीचा बंधारा तोडल्याचा प्रकार गुरुवारी घडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारे ४० ट्रॅक्टर अडविले. याबाबत महसूल प्रशासनाला माहिती देवूनही कोणीही अधिकारी घटनास्थळावर पोहलचे नाही. शेवटी बंधारा बांधून देण्याचा अटीवर अडवलेले सर्व ट्रॅक्टर सोडून देण्यात आले.
आव्हाणे, खेडी येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. सर्व वाहतूक ही आव्हाणे व बांभोरी मार्गातून होत असून, गुरुवारी आव्हाण्याचा ग्रामस्थांनी तीन महिन्यापूर्वी लोकसहभागातून तयार केलेला बंधारा वाळू माफियांनी तोडल्यामुळे नागरिकांनी वाळू माफियांविरोधात मोर्चा काढला. गावातील ५० हून अधिक नागरिकांनी नदीपात्रात जावून वाळू वाहतूक करणारी जवळपास ५० ट्रॅक्टर अडवून घेतले. तसेच याबाबत ग्रामस्थांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. तसेच यावेळी ग्रामस्थ व वाळू माफियांमध्ये शब्दिक वाद देखील झाले.
दोन तास ट्रॅक्टर अडवूनही अधिकारी पोहचले नाही
ग्रामस्थांनी महसूलच्या अधिकाºयांना फोन करून ट्रॅक्टर अडविल्याबाबतची माहिती देवूनही तब्बल दोन तासानंतरही कोणताही अधिकारी या ठिकाणी पोहचला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वाळू व्यावसायिकांना तोडलेला बंधारा बांधून देण्याचा सूचना दिल्या, हा बंधारा बांधून दिला तरच ट्रॅक्टर सोडून दिले जातील असे सांगितल्यानंतर हा बंधारा बांधण्याची तयारी दर्शविल्यानंतर सर्व ट्रॅक्टर सोडण्यात आले.
निष्क्रीय प्रशासन, मुजोर वाळूमाफिया
जे काम प्रशासनाने करणे गरजेचे आहे ते काम नागरिकांनी केल्यानंतरही प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी न पोहचल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निष्क्रीय प्रशासनामुळे वाळूमाफिया मुजोर होत असून, प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका निर्माण होत आहे.

Web Title: The Bandra sand mafican broke the band created from the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव