सर्व्हर बंदमुळे बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:17 AM2021-01-20T04:17:07+5:302021-01-20T04:17:07+5:30
जळगाव : बँक ऑफ बडोदाचे सर्व्हर बंद पडल्यामुळे त्याचा बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होऊन ग्राहकांना फटका बसल्याची तक्रारी ग्राहकांनी ...
जळगाव : बँक ऑफ बडोदाचे सर्व्हर बंद पडल्यामुळे त्याचा बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होऊन ग्राहकांना फटका बसल्याची तक्रारी ग्राहकांनी केली आहे. मात्र दोन दिवसांपासून सर्व्हर बंद होते, आता ते सुरळीत सुरू झाले असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बँक ऑफ बडोदाचे शहर व जिल्ह्यात शेकडो ग्राहक आहेत. दररोज धनादेश जमा करणे, ऑनलाईन रक्कम पाठविणे यासह रक्कम जमा करणे अथवा काढणे असे लाखो रुपयांचे व्यवहार होत असतात. यात नोकरदारांसह उद्योजक, व्यापाऱ्यांचाही मोठा समावेश असून राज्य तसेच देशातून कोठून माल मागवायचा झाल्यास रक्कम पाठवावी लागते व आलेल्या मालाचे पैसेही जमा करावे लागतात. मात्र बँकेचे सर्व्हर बंद पडल्यामुळे व्यवहार ठप्प होऊन त्याचा व्यापाऱ्यांसह बँकेच्या सर्वच ग्राहकांना बसला असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात बँकेच्या नवी पेठेतील शाखेतील अधिकाऱ्यांना विचारले असता दोन दिवसांपासून सर्व्हर बंद होते, आता ते सुरू झाले आहेत, असे सांगत या विषयी आपण अधिक माहिती देऊ शकत नसल्याचे सांगितले.