बॅँकेत ‘कॅश’ शॉर्टेज, मिळताहेत फक्त पाच हजार
By admin | Published: March 6, 2017 12:33 AM2017-03-06T00:33:09+5:302017-03-06T00:33:09+5:30
धरणगाव : रिझव्र्ह बँकेकडून पुरवठा होत नसल्याने ग्राहक अडचणीत
धरणगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण शाखांमध्ये आर्थिक तुटवडा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्टेट बँकांच्या शाखा पाच हजारांवर रक्कम द्यायला तयार नाही. परिणामी उद्योजकांसह बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहे.
सरकारने जाहीर केलेली नोटाबंदी सर्वसामान्यांनाच त्रासदायक ठरली. 100 दिवस लोटले तरी ग्रामीण भागात बँकांमधील गर्दी ओसरायला तयार नाही. आपले पैसे आपल्याला मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. आठवडय़ातून 24 हजार रुपये बँकेतून मिळणार ते कधी कुणाला एकाच वेळी मिळाले नाही, आता 50 हजारांर्पयत मर्यादा वाढवली, मात्र 50 हजार मिळणे तर दूरच, पाच हजार रुपये ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
धरणगाव तालुक्यातील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांना फक्त पाच हजार रुपये दिले जात आहेत. त्यात हजार रुपयांचे दहा-दहांचे डॉलर स्टेट बँकेकडून दिले जात असल्याने व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे. पुरेशी रक्कम स्टेट बँकेतून मिळत नसल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहे.
जिनिंग उद्योजक त्रस्त
स्टेट बँकेच्या ग्रामीण शाखांमधून पाच हजारांवर रक्कम मिळत नसल्याने जिनिंग उद्योजकांची आर्थिक कुचंबना झाली आहे. कापसाचे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी जिनिंगला रोख रकमेत कापूस विक्री करायला येत आहे. मात्र जिनिंग उद्योजगांकडे कॅश नसल्याने उद्योगही ठप्प झाला आहे.
एरंडोल/धरणगाव : 10 रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसल्याने बाजारपेठेत हे नाणे कुणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्टेट बँक देत असलेले या नाण्याचे करावे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टेट बँकेने दहाचे कॉईनचे चलन सुरू असल्याचे स्पष्ट करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रिझर्व बॅँक ऑफ इंडियातर्फे मिळणारे चलन अल्प असल्याने ग्राहकांना पाच हजार रुपये दिले जात आहेत. जास्तीची रक्कम आल्यास ग्राहकांना जास्त पैसे देऊ. तसेच 10 रुपयांच्या नाण्याचे चलन सुरू आहे. अफवांवर विश्वास कुणीही ठेऊ नये.
- अश्विनीकुमार देवरे, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक, धरणगाव
स्टेट बँकेकडून आम्हाला फक्त पाच हजार रुपये मिळत आहे. त्यामुळे रोख स्वरूपात शेतक:यांकडून कापूस खरेदी होत नाही. धनादेशही 15 दिवसात वटत आहे. त्यामुळे शेतक:यांना अडचण निर्माण झाली असून, उद्योजकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. -मुर्तेझा मुश्ताक बोहरी,
उद्योजक, धरणगाव