शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:41+5:302021-01-21T04:15:41+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे येथील शेतकरी सुभाष काशिनाथ राणे यांनी सन २०१०-११ मध्ये चाळीसगाव येथील देना बॅकेच्या शाखेकडून ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे येथील शेतकरी सुभाष काशिनाथ राणे यांनी सन २०१०-११ मध्ये चाळीसगाव येथील देना बॅकेच्या शाखेकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. यानंतर त्यांनी कर्जाचा एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे बँकेचे थकबाकीदार झाले. विशेष म्हणजे बँकेकडून दरम्यानच्या काळात थकबाकीची मागणीही राणे यांच्याकडून करण्यात आली. यानंतर ही बँक ऑफ बडोदा या बँकेत वर्ग झाली. या कर्जाबाबत दहा वर्षानंतर ८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे हे राणे यांच्याकडे आले. त्यांनी बँक ऑफ बडोदाची कर्ज थकल्याबाबतची नोटीस दाखविली. राणे यांनी घेतलेले ५ लाखांचे कर्ज आता १३ लाख रुपये झाले असल्याचे सांगत थकबाकी भरली नाही तर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल असे सांगितले. यावेळी राणे यांनी ट्रॅक्टर जप्त न करण्याची विनंती साबळे यांच्याकडे केली, तेव्हा राणे यांनी विनंती केल्यावर त्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी शेतकरी राणे यांनी नाईलाजाने साबळे यास दहा हजार रुपये दिले.