आजपासून बँका सुरळीत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:19+5:302021-03-17T04:17:19+5:30
जळगाव : खासगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे, १२५ कोटींचे व्यवहार ठप्प झाले. यामुळे नागरिकांनी एटीएमचा आधार ...
जळगाव : खासगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे, १२५ कोटींचे व्यवहार ठप्प झाले. यामुळे नागरिकांनी एटीएमचा आधार घेतल्यावर, शहरातील सर्व एटीएमवर गर्दी पहायला मिळाली. दरम्यान, संप मिटल्यानंतर १७ मार्चपासून बँका पुन्हा सुरळीत सुरू होणार आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या संपात नऊ संघटनांनी सहभाग घेतला होता. कोरोनामुळे मोर्चा वा निदर्शने न करता काम बंद ठेवून, केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. या संपात शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एकूण दीड हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, या संपामुळे नागरिकांनी दोन दिवस एटीएमवर गर्दी केलेली दिसून आली. दरम्यान, संप मिटल्यामुळे बँका बुधवारी वेळेनुसार उघडणार आहेत, अशी माहिती युनायटेड फोरम युनियनचे समन्वयक संदीप मोरदे यांनी दिली.