वरखेडीत ओढल्या बारागाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:01 AM2018-09-11T01:01:28+5:302018-09-11T01:05:33+5:30

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला.

 Barabagadas in Barakadhi | वरखेडीत ओढल्या बारागाड्या

वरखेडीत ओढल्या बारागाड्या

googlenewsNext
ठळक मुद्देपंचक्रोशीतील भाविकांची बारागाड्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दीहिंदू- मुस्लीम बांधवांचा मोठा सहभाग

वरखेडी ता.पाचोरा : येथे पोळ्याच्या दुसºया दिवशी अर्थात सोमवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावर्षी गजानन सुधाकर पाटील यांनी बारागाड्या ओढल्या.
वरखेडी येथे प्रभाकर रामकृष्ण पाटील यांच्या घरी खंडोबारायाचे ठाणे असून सोमवारी सकाळी सात वाजता या ठिकाणाहून बारागाड्या ओढणाºया भगतच्या हस्ते गावातील सर्व ग्रामदेवतांना आंघोळ घालण्यासाठी वाजत-गाजत जावून बारागाड्या ओढण्याच्या वेळेस सर्व देवतांना येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर या ग्रामदेवताना दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखविला गेला. सायंकाळी पाच वाजता भगताला आंघोळ घालून तळी उचलण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मारोती मंदिरात भगताला पागोटी, कंठ, शाल पांघरूण मारोतीला प्रदक्षिणा घालण्यात आली आणि डांभूर्णी रोडवर मराठी शाळेजवळील चढतीच्या जागी उभ्या असलेल्या व अबालवृद्धांनी खचाखच भरलेल्या बारा गाड्या सहा वाजेच्या सुमारास ओढल्या गेल्या.
यावेळी वरखेडी आणि भोकरीसह पंचक्रोशीतील गावातील भाविक जनता हजारोच्या संख्येने बारागाड्या पाहण्यासाठी मुलाबाळांसह उपस्थित होते. विना पोलीस बंदोबस्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. यावेळी वरखेडी-भोकरी येथील हिंदू-मुस्लीम बांधवांच्या सहकार्याने हा बारागाड्यांचा उत्सव पार पडला.

 

Web Title:  Barabagadas in Barakadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.