चाळीसगावच्या कोरोना फायटर्ससाठी ‘बारामती’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:29 PM2020-04-12T17:29:40+5:302020-04-12T17:30:39+5:30

कोरोना फायटर्ससाठी कर्जत - जामखेडचे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी 'सॅनिटायझर' पाठवून मदतीचा हात दिला आहे.

'Baramati' help for the Corona Fighters of Chalisgaon | चाळीसगावच्या कोरोना फायटर्ससाठी ‘बारामती’ची मदत

चाळीसगावच्या कोरोना फायटर्ससाठी ‘बारामती’ची मदत

Next
ठळक मुद्दे ६० लीटर सॅनिटायझर दिलेआ. रोहित पवार यांची सामाजिक कृतज्ञता

चाळीसगाव, जि.जळगाव : आशा स्वयंसेविका, पालिकेचे आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी सद्य:स्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करीत आहे. या कोरोना फायटर्ससाठी कर्जत - जामखेडचे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी 'सॅनिटायझर' पाठवून मदतीचा हात दिला आहे. जि.प. व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य भूषण काशिनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने मदत मिळालेली ही मदत रविवारी वैद्यकीय विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता हा चांगला उपाय आहे. यासाठी सॅनिटायझर महत्वाचे ठरते. तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या १० आरोग्य केंद्रासह न.पा.च्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही थेट बारामतीहून सॅनिटायझरची मदत मिळाली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात राहाणे आणि खबरदारी पाळणे एकमेव उपाय आहे. मात्र कामासाठी घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग टाळावा. यासाठी सॅनिटायझर हा उपाय आहे. मात्र सध्या सर्वत्र सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू झाला असून ते उपलब्ध होण्यासही अडचणी येतात. अशा तक्रारी आहेत. मात्र कर्जत - जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार आणि बारामती एॅग्रो लिमिटेडच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रात काम करणारे कर्मचारी, परिचारिका, नर्सेस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी सॅनिटायझरची मदत पाठवली आहे.
प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी पाच लीटर तर न.पा. आरोग्य विभागातील कर्मचाºयासाठी १० लीटर सॅनिटायझर देण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्याकडे सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी जि.प. राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, जि.प. व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य भूषण पाटील, सुधीर पाटील, मिलिंद शेलार उपस्थित होते.
पं.स.सभापतींकडून एक हजार मास्क
पंचायत समितीचे सभापती अजय पाटील व उपसभापती भाऊसाहेब पाटील यांनी तालुक्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांसाठी एक हजार मास्क उपलब्ध करून दिले आहे.

Web Title: 'Baramati' help for the Corona Fighters of Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.