बारदान शिलाई कामगार मजुरीत ३० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:26+5:302021-01-04T04:13:26+5:30
जळगाव : मार्केट यार्डातील बारदान शिलाई कामगार यांच्या मजुरीत ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय बारदान व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत ...
जळगाव : मार्केट यार्डातील बारदान शिलाई कामगार यांच्या मजुरीत ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय बारदान व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत घेतला आहे. जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेचे हे कामगार आहेत. २ वर्षांच्या करारानुसार ही भाववाढ होत असते ही मुदत डिसेंबरमध्ये संपली होती. तसे पत्र संघटनेने बारदान व्यापारी असोसिएशनला दिले होते. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रराज सपकाळे, जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, जिल्हा सरचिटणीस शरद चौधरी, व्यापारी प्रतिनधी नंदू राठी, भरत भानुशाली, लोटन राजपूत, देविलाल प्रजापत, कामगार प्रतिनिधी अरूण राजपूत, सलीम रंगरेज, विठ्ठल राजपूत, देवीदास राजपूत, दीपक राजपूत, प्रकाश राजपूत आदी उपस्थित होते.
५ जानेवारीला प्रवेश प्रक्रिया
जळगाव : प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी संस्थेच्या स्तरावर ५ जानेवारी रोजी समुपदेशनाने प्रवेश प्रक्रिया राबविण्या येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत संस्थेत येऊन अर्ज करावा, त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून याच दिवशी सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रिक्त जागांवर त्याच दिवशी प्रवेश देण्यात येणार असल्याचे शासकीय तंत्रनिकतेनच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
जळगाव : इच्छादेवी चौक ते डी- मार्ट पर्यंतच्या रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी वासुदेव कुकरेजा यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यांवर दुभाजक टाकणे व विद्युत पोल शिफ्टचे काम मंजूर होतेे. तीन महिन्यांपूर्वी कामांना सुरवातही झाली. मात्र, साईड पट्याचे काम अपूर्ण असून यामुळे वाहतूकची कोंडी होत असल्याचे हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी कुकरेजा यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
रक्तदानाद्वारे नववर्षाचे स्वागत
जळगाव : मुक्ती फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी रक्तदान करून नववर्षाचे स्वागत केले. अरूश्री -शुभम परिवाराच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. रक्तसाठा कमी होऊ नये म्हणून रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.