शेंदुर्णी येथे बारी समाजाचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:41 PM2018-09-27T22:41:23+5:302018-09-27T22:49:31+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बारी समाजाच्या मतिमंद मुलीवर गावातीलच प्रकाश पांडुरंग लोने (वय ४५) या नराधमाने अत्याचार केला.
शेंदुर्णी ता जामनेर : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बारी समाजाच्या मतिमंद मुलीवर गावातीलच प्रकाश पांडुरंग लोने (वय ४५) या नराधमाने अत्याचार केला. हा खटला जलद न्यायालयात चालवून त्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या आशयाची मागणी शेंदुर्णी येथे काढण्यात आलेल्या मुकमोर्चावेळी करण्यात आली.
माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, सुधाकर बारी, नरेंद्र बारी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंडित जोहरे ,अमृत खलसे, नामदेव बारी, शंकर बारी, अॅड.प्रसन्ना फासे, विठ्ठल फासे, डॉ.युवराज बारी, भास्कर ढगे, विजया खलसे, साधना बारी यांच्यासह महिला सहभागी झाल्या.