यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना काकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:53 PM2019-05-19T18:53:37+5:302019-05-19T18:54:24+5:30

चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा अशा भावंडांच्या पित्याचे अचानक निधन झाल्याने पोरके झालेल्या या दोघांना त्यांच्या काकांनी आधार देवून आपले वारस म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रमदेखील घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तयार केले आहे. बालकांना काकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर होण्यास मदत होणार आहे.

The base of the children who lost their father's umbrella in Hingona in Yaval taluka | यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना काकांचा आधार

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना काकांचा आधार

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांच्या आईने दिली संमत्तीपौराहित्य करुन शास्त्रोक्त विधीप्रमाणे दत्तक विधानकायद्यानुसारही तयार केले दत्तक विधानपत्र

रणजित भालेराव
हिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा अशा भावंडांच्या पित्याचे अचानक निधन झाल्याने पोरके झालेल्या या दोघांना त्यांच्या काकांनी आधार देवून आपले वारस म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रमदेखील घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तयार केले आहे. बालकांना काकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर होण्यास मदत होणार आहे.
हिंगोणे येथिल रहिवासी कैलास गोपाल गाजरे यांचे २०१७ मध्ये निधन झाले. यादरम्यान, त्यांची आई सपना कैलास गाजरे यांना या दोन्ही मुलांचे पालन पोषण करून सांभाळ करणे शक्य होत नव्हते. अशातच मुलांचे काका गुणवंत गोपाळ गाजरे यांना अपत्य नसल्याने आयुष्यात कुणाचा तरी सहारा व अपत्य प्रेम मिळावे या हेतूने त्यांनी आपल्याच भावाच्या दोन्ही मुलांना दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानुसार, मुलांच्या आईशी चर्चा करण्यात आली. त्यांनी संमती दिल्याने दत्तक घेण्यासंदर्भात काकांनी निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार दि. १५ मे रोजी पुरोहित प्रवीण जोशी यांनी पौराहित्य करुन शास्त्रोक्त विधीप्रमाणे दत्तक विधानाचा कार्यक्रम पार पाडला. मुलगी ईश्वरी ही चार वर्ष वयाची असून, मुलगा तुषार हा तीन वर्षे वयाचा आहे. आपल्याच काका-काकुंचा आधार आई-वडील म्हणून लाभणार असल्याने या मुलांचे भविष्य सुखकर होण्यास मदत होणार आहे.
दत्तक विधान कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १६ मे रोजी सावदा, ता.रावेर येथे कायद्यानुसार दत्तकपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात १ हजार रुपयांच्या स्टँपवर तयार करण्यात आले. त्यात मुलांची आई सपना गाजरे यांनी दत्तक वडील गुणवंत गाजरे व दत्तक आई दीपाली गाजरे यांना आपली दोन्ही मुले दत्तक दिल्याचे लिहून दिले आहे व त्यांनीसुद्धा लिहून घेतले आहे. त्याचप्रमाणे यासाठी साक्षीदार म्हणून सावदा येथील वसंत पुरुषोत्तम होले व हिंगोणा येथील किसन तुकाराम बोरोले यांच्या स्वाक्षºया आहे.
पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना आपल्याच काकांनी आधार दिल्यामुळे मुलांना परकेपणा न वाटता आपल्याच घरात ते मनमोकळेपणे आनंदी राहू शकणार आहे. मुलांचे पालनपोषण व सांभाळण्याची जबाबदारी घेतलेल्या गुणवंत गाजरे व दीपाली गाजरे यांचे कौतुक होत आहे.

Web Title: The base of the children who lost their father's umbrella in Hingona in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.