संशयिताच्या मृत्यूनंतर घातली आंघोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 07:03 PM2020-07-02T19:03:17+5:302020-07-02T19:04:40+5:30

कोरपावली येथील कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी मृतदेहास आंघोळ घातली.

Bathing after the death of the suspect | संशयिताच्या मृत्यूनंतर घातली आंघोळ

संशयिताच्या मृत्यूनंतर घातली आंघोळ

Next
ठळक मुद्दे कोरपावली येथील प्रकारअंत्यविधीस शंभरावर नागरिकांची उपस्थितीमयताच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

चुंचाळे : यावल तालुक्यातील कोरपावली येथील कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी मृतदेहास आंघोळ घातली. अंत्यविधीस शंभरच्या आसपास नागरिक उपस्थित होते. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरपावली येथील ८० वर्षीय वृद्धाचा गोदावरी रुग्णालयात कोरोनाने २९ जूनला मृत्यू झाला. मृत हे कोरोना संशयित असल्याने मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी योग्य त्या अटी व शर्र्थींसह मयताच्या मुलास प्लॅस्टिकमध्ये सुरक्षित बांधून कोणताही विधी न करता, सरळ कब्रस्तानमध्ये घेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देवून मृतदेह ताब्यात देण्यात आला. मृतदेह थेट कब्रस्तानमध्ये न नेता, घरी नेला. मृतदेहाचे बांधलेले प्लॅस्टिक सोडून मृतास आंघोळ घातली. नंतर अंत्यसंस्कारप्रसंगी जवळपास शंभरावर नागरिक उपस्थित होते. ३० रोजी दुपारी हा प्रकार घडला.
लॉकडाऊन व संचारबंदीचा नियम मोडून मृतावर दफनविधी केला. म्हणून मयताच्या मुलाविरुद्ध पोलीस पाटील सलीम रमजान तडवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
दरम्यान, मयताच्या कुटुंबातील सात जणांना क्वॉरंटाईन करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनीदिली. कोरपावली गावातील मयताच्या संपर्कात आलेल्या अजून काही जणांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

Web Title: Bathing after the death of the suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.