बात्सर येथे हरभऱ्याची झाली ‘होळी’, दीड एकरातील पिक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:25 PM2019-03-22T18:25:17+5:302019-03-22T18:25:37+5:30

पुन्हा शेतातील गंजीला लावली आग

In Batsar, there was a raining of 'Holi' and one-and-a-half grams were burnt | बात्सर येथे हरभऱ्याची झाली ‘होळी’, दीड एकरातील पिक जळून खाक

बात्सर येथे हरभऱ्याची झाली ‘होळी’, दीड एकरातील पिक जळून खाक

Next

खेडगाव, ता. भडगाव : बुधवारी रात्री सगळीकडे दृष्ट प्रवृत्तीचे दहनाचे प्रतीक असलेली होळी साजरी होत असतानाच अज्ञात माथेफिरुच्या दृष्ट प्रवृत्तीने गिरणाकाठावरील बात्सर येथील बालू उर्फ बळवंत चिंतामण पाटील या गरीब शेतकऱ्याच्या हरभºयाच्या गंजीला आग लावून अक्षरश: ‘होळी’ करीत स्वप्नांची राखरांगोळी केली. विशेष म्हणजे याच महिन्यात येथीलच बापू सुपडू पाटील यांचा अडीच एकरातील हरभरा असाच आग लावून खाक करण्यात आला होता.
बालू पाटील हे होळीसारखा सण असतानाही आपली दीड एकर हरभरा गंजी संभाळण्यासाठी बुधवारी रात्री दोन कि.मी.वरील शेतावर गेले. दिवसभराच्या श्रमाने त्यांचे खाटेवर अंग टाकताच डोळे लागले. अचानक त्यांना जाग आली ती पेटलेल्या हरभरा गंजीच्या तडतड आवाजाने. तोपर्यंत आग व ज्वाळांनी भडका घेतला होता. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावत येवून गंजीतून न पेटलेला हरभरा बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने हरभरा क्षणार्धात गिळंकृत केला. १५-१६ पोते हरभरा येणार म्हणून आनंदात असलेले बालू पाटील यांनी टाहो फोडला. शेतकºयांनी त्यांना धीर देत घरी आणले. यात अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले.
हा खार करणारा कोण? अन् खार कुणाचा?
हरभºयाला खार (खारवटपणा) असतो. असे कोणताही शेतकरी सहजपणे बोलतो. येथे काय वैर-खार असेल की हरभºयाच्या गंजीला पंधरा दिवसात दुसºयांदा पुन्हा आग लावली गेली. खार करणाºयाने माणसाचा जरुर खार करावा, पण मातीशी, अन्नाशी वैरखार करुन काय साधणार? अशी विकृती आजवर पहावयास मिळाली नाही, अशा संतप्त भावना बात्सरांनी व्यक्त केल्या. माजी सरपंच भीकन पाटील यांनी तर ‘फार पूर्वी गावात आप-आपसात भांडण-तंटे होत तेव्हा सुध्दा असा प्रकार शेतमाला संदर्भात कधी घडला नाही, आता मात्र तसे काही नाही तरी आग लावण्याच्या प्रकारामुळे शेतपसारा सांभाळणार कसा? ही चिंता शेतकºयांना लागल्याचे सांगितले.
मदतीची तरतुदीचे काय ?
नैसर्गिक आपत्ती, शॉर्ट सर्कीटने आगने शेतमालाचे नुकसान झाले तरच पंचनामा वैगेरे गोष्टीला महत्त्व. कारण निदान काहीना-काही शासकीय आर्थिक मदत मिळते. येथे मात्र आग लावली असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत असले तरी अशा घटनांमध्ये शासकीय मदतीची तरतूदच नसल्याचे शेतकरी सांगतात. कारण बात्सर येथे याआधी पंधरा दिवसापूर्वी बापू पाटील या शेतकºयाचा अडीच एकरावरील हरभरा असाच आग लावून जाळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पंचनामाही झाला. आता अशा घटनेत पंचनामा करावयाचा का नाही? यावरुन महसूल यंत्रणेतच चर्चेचे गुºहाळ सुरु आहे.
शेतमाल हा उघडा पसारा असतो. आता अशा घटनांना जबाबदार कोण? यामुळे शेतकºयाच्या मालाचे नुकसान कोणत्याही प्रकारे असो, पिकविमा असो की नसो, त्यास आर्थिक संरक्षण व नुकसान भरपाई मिळावयास हवी, अशी मागणी यानिमित्ताने शेतकरी करीत आहेत.
बुधवारी रात्री हे पाटील कुंटुंब झोपलेच नाही. रात्रभर अश्रुंच्या धारा सुरु होत्या. पती, पत्नी आणि लग्नाला आलेला एक मुलगा, दोन मुलींचे लग्न झालेले. मागील वर्षीच घर बांधले, त्याचे डोक्यावर तीन लाखाचे कर्ज. फक्त दीड एकर वडिलोपार्जीत जमीन. त्यात उदरनिर्वाह भागत नाही. तिघेही रोजंदारीने दुसºयाच्या शेतावर कामाला जातात. त्यातच दुष्काळ. खुट्याला एक गाय होती. चारा व खर्चापायी ती नुकतीच विकली. भीषण पाणीटंचाई, विहीर कोरडीच. कसे-बसे दुसºयांकडून पाणी घेत हरभºयाला पाणी भरले व तो घरच्या घरी कापला. या हरभºयाची पिता-पूत्राने गंजी घातली. घटना घडली त्या दिवशी पती अन् पत्नी दोघांनी शेतात खाली पडलेल्या हरभरा वेचला. तो आला फक्त एक टोपलीभर. त्यासाठी दोघांनी उन्हात घाम गाळत दिवस घातला आणि रात्री १६ पोते हरभरा येणारी राशीची कुणीतरी माथेफिरुने होळी केली आणि क्षणाधार्थ स्वप्नांची राखरांगोळी झाली.
कोणत्या जिवाला झोप लागेल? अन्न गोड लागेल? आजूबाजूच्या महिला बसूनच होत्या. हयाती राह्यनी ते कमाडी लेसूत..! अशी उगीचच आशा लावीत पाटील कुटुंबाचे सांत्वन या महिला करीत होत्या. पण दोन दिवसावर कर्जापोटी तीस हजाराचा हप्ता भरावयाचा कसा?, अशा प्रश्न पाटील कुटुंबापुढे उभा आहे. आधीच शेतकºयांच्या विवाहयोग्य मुलांना मुली मिळत नाही. हरभरा विकून लग्नाला आलेल्या एकुलत्या एक मुलासाठी सोयरिक पहायला बाहेर निघू या विचारात असलेल्या पित्याचे अंतकरण आता आतून पिळवटून निघत आहे. ‘चारासाठे गाय यिकी.., हरभरान् खारे (कुट्टी) यंदा नातेवाईकले न देता, एकजणले १० रु बेन् लियसन कबूल करेल होत.. ते ही गय... ती माऊली तर तोंडमातला घास हाणी पाडा रे दादा..! अशी भावना व्यक्त करीत आपल्या अश्रूंना पाटील कुटुंबाने मोकळी वाट करुन दिली.

Web Title: In Batsar, there was a raining of 'Holi' and one-and-a-half grams were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव