खान्देशातील ६७७ गावांतील बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:05+5:302021-05-18T04:18:05+5:30
चक्रीवादळाचा फटका : जळगाव जिल्ह्यातील २२ घरांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका जळगाव जिल्ह्यासह धुळे ...
चक्रीवादळाचा फटका : जळगाव जिल्ह्यातील २२ घरांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारलाही चांगलाच बसला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणचे सब स्टेशन व वीज खांब कोसळल्यामुळे खान्देशातील सुमारे ६७७ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात सोमवारी सायंकाळपर्यंत महावितरण प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती महावितरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी 'लोकमत'ला दिली.
तौक्ते चक्रीवादळामुळे रविवारी जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे अमळनेर तालुक्यातील अंचलवाडीतील दोघी बहिणींचा मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील तीन हेक्टर जमिनीवरील नुकसान झाले. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.