जळगाव शहरात अनेक भागात बत्ती गुल्ल; पावसाने जोरदार हजेरी लावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 08:00 PM2023-09-09T20:00:18+5:302023-09-09T20:00:35+5:30
भूषण श्रीखंडे जळगाव : शहरात शुक्रवारी सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे रात्री साडेनऊ पासून शहरातील अनेक ...
भूषण श्रीखंडे
जळगाव : शहरात शुक्रवारी सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे रात्री साडेनऊ पासून शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यासह शहरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. शुक्रवारी सायंकाळ पासून पावसाचा जोर वाढला होता. त्यात रात्री साडेनऊ पासून शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाल्याने पावसात घरी जाणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. रस्त्यांवर पाणी, खड्डे त्यात अंधारात मार्ग काढत जावे लागत होते.
काही भागात रात्री उशीरा वीज पुरवठा सुरळीत झाला तर काही भागात रात्री रात्री लाईट ये-जा करीत होती. तर काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्याने सकाळ पर्यंत विद्युत पुरवठा बंद होता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ज्या भागात शुक्रवारी रात्रीपासून विद्युत पुरवठा बंद होता तेथे विद्युत वाहिन्या जोडणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.