बुद्धं शरणं गच्छामि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:17 AM2021-05-27T04:17:36+5:302021-05-27T04:17:36+5:30

बुद्ध पौर्णिमा : कोरोनामुळे शहरातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांतर्फे बुद्ध पौर्णिमा साधेपणाने साजरी जळगाव : बुद्धं शरणं गच्छामि। ...

बुद्धं शरणं गच्छामि ... | बुद्धं शरणं गच्छामि...

बुद्धं शरणं गच्छामि...

Next

बुद्ध पौर्णिमा : कोरोनामुळे शहरातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांतर्फे बुद्ध पौर्णिमा साधेपणाने साजरी

जळगाव : बुद्धं शरणं गच्छामि।

धर्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। अशी प्रार्थना म्हणत, जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा बुधवारी जळगाव शहरातील विविध शासकीय, सामाजिक संस्थांतर्फे कोरोनामुळे यंदाही साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरम्यान, जयंतीनिमित्त शहरातील विविध बुद्ध विहारांवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

आरपीआय

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते मनपा प्रशासनाच्या वतीने भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे अध्यक्ष अनिल अडकमोल, जे. डी .भालेराव, प्रताप बनसोडे, प्रवीण परदेशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निसर्ग मित्र समिती

जळगाव : येथील निसर्ग मित्र समिती व राष्ट्रीय हरित सेनेतर्फे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, मंडळ उपाध्यक्ष शालू जाधव, राष्ट्रीय हरित सेनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, स्वप्नरंग बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष महेश राठी, जिभाऊ वानखेडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बेंडाळे महाविद्यालयातर्फे ऑनलाईन कविसंमेलन

जळगाव : डॉ .अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात मराठी विभागातर्फे बुद्ध पौर्णिमा आणि डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नवोदित कवी कमलेश महाले, मोना तडवी, सारांश सोनार यांनी बुद्धांवरील विविध कविता सादर केल्या .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ .गौरी राणे होत्या. तसेच प्राचार्य डॉ. व्ही. जे.पाटील, डॉ. पी. एन. तायडे, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सत्यजित साळवे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले. आभार प्रा. भावना संकोपाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. वंदना नेमाडे ,प्रा. विनोद भालेराव व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .

इन्फो :

रिपाइं (खरात गट)

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटातर्फे भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीचे अध्यक्ष अजीज शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष जे. डी. भालेराव, सचिव प्रवीण परदेशी, महानगर अध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे, प्रकाश सोनवणे, दीपक बिऱ्हाडे, अण्णा अडकमोल, रवींद्र जाधव, नरेंद्र सपकाळे, चंद्रकांत अहिरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

समता जागृती बहुउद्देशीय संस्था

जळगाव : शहरातील समता जागृती बहुउद्देशीय संस्थेतर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार, आनंदा तायडे, गौतम सपकाळे, राजू सपकाळे, वासुदेव कुकरेजा, नाना डोंगरे, दीपक तायडे, सिद्धार्थ तायडे, विकास तायडे, भारत ब्राम्हणे, सचिन सपकाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: बुद्धं शरणं गच्छामि ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.