इंधवे गणासाठी पोटनिवडणुकीबाबत बीडीओंचे निवडणुक आयोगाला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 10:17 PM2017-10-12T22:17:56+5:302017-10-12T22:20:14+5:30
खळबळ: जिल्हाधिकारी म्हणतात माहिती घेतो
लोकमत आॅनलाईन, जळगाव, दि.१२- एकीकडे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधातील वसंतनगर गणातील पं.स. सदस्या छाया पाटील यांचे अपिल मंजूर केलेले असतानाही पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) वसंतनगर पं.स. गणातील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातील सदस्यपद रिक्त झाल्याने ते जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ चे कलम ६३ नुसार भरण्याची कार्यवाही करण्याची मागणी करणारे पत्र थेट राज्य निवडणुक आयुक्तांना पाठविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ९ आॅक्टोबर २०१७ रोजी दिलेल्या या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात १० रोजी प्राप्त झाली आहे. पारोळा तालुक्यातील शिरसोदे प स सदस्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या छाया पाटील रा.इंदवे यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र घोषीत केले आहे. याप्रकरणी रत्ना पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपिलात सुनावणीसाठी कागदपत्रांची तपासणी करताना महसूल विभागाला प स सदस्या पाटील यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर केल्याबाबत सादर केलेल्या शपथपत्रावरील पारोळा तहसीलदारांची (कार्यकारी दंडाधिकारी) स्वाक्षरी बोगस असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणात पारोळा तहसीलमधील काही कर्मचारीही सहभागी असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढत याप्रकरणी फेर चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहे. त्यासाठी अपील अंशत: मंजूर करण्यात आले आहे. असे असताना पारोळा बीडीओंनी जिल्हाधिकाºयांचे १७ जुलै २०१७च्या आदेशाच्या अनुषंगाने थेट राज्य निवडणूक आयुक्तांना ९ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून प.स. सदस्य छाया पाटील यांना अपात्र ठरविल्याने जागा रिक्त झाली असून ती भरण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी अनभिज्ञ याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारणा केली असता हे प्रकरण त्यांच्यापर्यंत आलेले नाही. माहिती घेतो, असे सांगितले.