कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीडीओंनी वैद्यकीय शिक्षण लावले सार्थकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:06 PM2020-05-16T16:06:39+5:302020-05-16T16:08:08+5:30

कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली अमृतपेय आयुर्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावले आहे.

The BDs made medical education worthwhile to boost the immunity of Corona Warriors | कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीडीओंनी वैद्यकीय शिक्षण लावले सार्थकी

कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीडीओंनी वैद्यकीय शिक्षण लावले सार्थकी

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे हटके बातमीरावेर : आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पं.स.शेष फंड व दात्यांच्या योगदानातून उभारताय दीड लाख रुपये निधी

किरण चौधरी
रावेर : कोरोनाच्या महामारीत कोरोना बाधित रूग्णांची आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा बजावणाºया तालुक्यातील सुमारे एक हजार वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशावर्कर या कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली अमृतपेय आयुर्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावले आहे.
गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांचा राजकीय दबावाला बळी न पडता शिस्तबद्ध प्रशासनाचा नावलौकिक आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीत ग्रामसेवकांची भूमिकाही निर्णायक ठरली आहे.
त्यांची कार्यतत्परता व प्रशासनाची चुणूक दाखवताना त्यांनी गटविकास अधिकारी पदावरून लोकसेवा बजावताना आपल्या बीएएमएस या वैद्यकीय शिक्षणाचा वेळोवेळी अलौकिक वापर करून गटविकास अधिकारी रूपातील डॉक्टर असल्याची तालुक्याला अनुभूती यापूर्वीही अनेकदा दिली आहे.
कोरोना महामारीच्या आधी लालमाती आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सिकलसेलने मृत्यू झाला असताना तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी लागणारे किट शासनाकडून उपलब्ध झाली नव्हती. तेव्हा त्यांनी तालुक्यातील आश्रमशाळांसह जि.प.प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्याची किट उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या शेषफंडातून एक लाख रुपयांचा निधी विशेष हक्क राखून वर्ग केला होता.
दरम्यान, केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या आयुर्वेदिक हर्बल्स व औषधींचा उकाडा असलेले अमृतपेय आयुर्वेदिक औषधी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात येवून संस्थात्मक विलगीकरण केलेल्या सहा हजार २१० संशयित रूग्णांनी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सतत सात दिवस सेवन केल्याने त्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.
त्या डॉ.नाकाडे यांनी आपल्या आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षणाची कास धरून कोरोना नियंत्रणासाठी जीव धोक्यात घालून वावरणाºया २५५ आशा वर्कर, ३१८ अंगणवाडी सेविका व ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संशमनी वटी दोन गोळ्या २ वेळा व अनुतेल नस्य २ - २ थेंब ही आयुर्वेदिक अमृतपेय औषधी वितरीत करण्याचा प्रस्ताव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे ठेवला होता. त्यास त्यांनी मंजुरी दिल्याने डॉ.नाकाडे यांनी पंचायत समिती शेष फंडातून ५० हजार रू.चा निधी उभारला आहे. जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पं.स.सभापती जितेंद्र पाटील यांच्यासह अनेक दात्यांनी दीड लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी दातृत्वाचे हात पुढे केले आहेत.
तालुक्यातील कोरोना वॉरीयर्ससह ग्रा.पं.कर्मचाºयांना संबंधित ग्रा.पं.नी आपापल्या ग्रामनिधीतून आयुर्वेदिक अमृतपेय उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश पारीत केल्याची माहिती त्यांनी दिलीे. कोरोना वॉरीयर्सचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या त्यांच्या या संकल्पनेचे समाजमनातून कौतुक होत आहे.

Web Title: The BDs made medical education worthwhile to boost the immunity of Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.