आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा - अभिनेत्री नयना आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:38 PM2019-06-23T12:38:14+5:302019-06-23T12:38:27+5:30

‘लोकमत’शी संवाद

Be happy with the negativity of you | आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा - अभिनेत्री नयना आपटे

आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा - अभिनेत्री नयना आपटे

Next

जळगाव : स्पर्धेत कायम टिकून राहण्यासाठी चिकाटी आणि धीर हवा. प्रलोभनाच्या मागे धावू नका, हे आभासी जग आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संधी शोधा. कामाला कमतरता नाही. पण संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. आपल्यातली नकारात्मकता काढून आनंदी रहा, असे मत ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांनी व्यक्त केले आहे. ७४ मराठी नाटके, २५ हून अधिक मराठी चित्रपट, विविध मालिका तसेच हिंदी, मराठी, गुजराथी रंगभूमी गाजवलेल्या पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ कलावंत नयना आपटे या नुकत्याच ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘सुनेच्या राशीला सासू’ या नाटकाच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या. त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : आपण या क्षेत्रात कशा आल्या
आपटे : आई शांता आपटे उत्तम अभिनेत्री आणि गायिका. आईनेच केलेल्या नाटकात सुरुवातीला बालकलावंत म्हणून वयाच्या चवथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. तिच माझी पहिली गुरू. तिच्याच इच्छेने कलेच्या प्रांतात आवड निर्माण होऊन याच क्षेत्राशी जोडले गेले.
प्रश्न : वय वर्षे ४ ते आजतागयातच्या प्रवासा विषयी ?
आपटे : कलेच्या प्रांतात करीअर करायच ठरवल्याने हा प्रवास सुखावणारा आहे. नकळत्या वयात रंगभूमीवर पदार्पण केले. विविध भूमिका साकारल्या. नृत्याचे शिक्षण पं.रोहिणी भाटे यांच्याकडून घेतले. घरातच गाणं असल्याने आईकडून गाणे शिकलो. नाटक, चित्रपट करत असतांना अनेक दिग्गज कलाकारांसमवेत भूमिका करायला मिळाल्या.उत्तम दिग्दर्र्शक लाभल्याने या प्रवासात खूप शिकायला मिळाले. अजूनही शिकत आहे.
प्रश्न : एक कलावंत आणि एक गृहिणी यांचा मेळ कसा घालतात ?
आपटे : कुटुंबाची मला पूर्ण साथ आहे. कला आणि कुटुंब यांचा सुंदर ताळमेळ साधते. प्रयोग संपल्यावर लगेचच मेकअप उतरून काही मिनीटात बाहेर पडते. घरी माझी मंडळी वाट पहात आहेत याची सतत जाणीव असते. पार्टी, लग्न, समारंभ यात जास्त जायला आवडत नाही. घरी असले की भाजी पोळी, वरण-भात, कोशिंबीर सगळं हाताने करते. गुळ टाकून केलेली पुरणपोळी मला छान करता येते. सकाळी ४ ला मला जाग येतेच. मग योगा, गाण्याचा रियाज, फिरायला जाणे नियमाने करते.
सखींना काय सांगाल ? आणि सुनेच्या राशीला सासू नाटकाबद्दल ?
भरपूर वाचन करा, वाचनाने विचारांची प्रगल्भता वाढते. चागलं ऐका, बोला पण कुणाशी ? तर बुद्धीमान लोकाशी. ते एखादा विषय कसा मांडतात त लक्षपूर्वक ऐका. आपलं आयुष्य आनंदी राहण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच प्रामुख्यानं आपल मानसिक अन शारीरिक आरोग्य आपल्यातील नकारात्मका काढून टाकत आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे.
सध्याच्या मुला-मुलींना काय सांगू इच्छिता ?
अभिनय, गाण, नृत्य अथवा कोणतीही कला ही उपजत असली तरी गुरूकडे राहून आत्मसाथ केली जावी. सध्या मुल रिअ‍ॅलिटी शो मधून बक्षीस मिळवून रातोरात स्टार होतात. पण या स्पर्धेत कायम टिकून राहण्यासाठी चिकाटी हवी, धीर हवा, प्रलोभनाच्या मागे धावू नका, हे आभासी जग आहे. मुंबर्ईचेच स्वप्न न पाहता आपल्या आजूबाजूला असणाºया संधी शोधा. कामाला कमतरता नाही. पण संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. प्रयोग उत्तम होण्यासाठी प्रेक्षकांचीही जबाबदारी असते.
नाटक कसे करावे, याचे जसे शिबिर असते. तसेच नाटक कसे बघावे, यासाठीही शिबिर घ्यायला हवीत. - नयन आपटे

Web Title: Be happy with the negativity of you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव