कवी होण्यासाठी आधी माणूस व्हायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:07 PM2021-01-28T19:07:22+5:302021-01-28T19:07:36+5:30

जळगाव : मराठीत भाषांतराला मोठा वाव असून, इतर भाषांमध्ये नवीन शब्दांचा जसा अंतर्भाव होत असतो, तशी नवीन शब्दांची निर्मिती ...

To be a poet, one must first be a man | कवी होण्यासाठी आधी माणूस व्हायला हवे

कवी होण्यासाठी आधी माणूस व्हायला हवे

Next

जळगाव : मराठीत भाषांतराला मोठा वाव असून, इतर भाषांमध्ये नवीन शब्दांचा जसा अंतर्भाव होत असतो, तशी नवीन शब्दांची निर्मिती मराठीत होणे आवश्यक आहे. तसेच कवी होण्यासाठी आधी माणूस व्हायला हवे, असे प्रतिपादन कवी किरण येले यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा गुरुवारी समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार होते. यावेळी बोलताना प्रा. पवार यांनी मराठी भाषेशी निगडित क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी असल्याचे सांगितले. नेत्रा उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आशुतोष पाटील यांनी आभार मानले.

 

Web Title: To be a poet, one must first be a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.