आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:44+5:302021-04-26T04:14:44+5:30
नशिराबादचे डॉ.भंगाळे देताय वृक्षसंवर्धनाचा संदेश नशिराबाद : सद्यस्थितीला कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रूग्णांना आपले प्राण ...
नशिराबादचे डॉ.भंगाळे देताय वृक्षसंवर्धनाचा संदेश
नशिराबाद : सद्यस्थितीला कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले. परिणामी, आता ऑक्सिजनची खरी किंमत प्रत्येकाला कळत आहे. त्यामुळे प्रत्येक आजारी रुग्णाच्या चिठ्ठीवरचं आजारातून बरे झाल्यावर एक झाड अवश्य लावा, म्हणजेचं तुम्हाला व येणा-या तुमच्या पिढीला भविष्यात ऑक्सिजनची कमी पडणार नाही, अशी सूचना देऊन जनजागृतीचे काम नशिराबाद येथील डॉ.आशुतोष भंगाळे करीत आहेत.
नशिराबाद येथील साई गजानन क्लिनिकचे डॉ.आशुतोष भंगाळे यांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधांच्या जोडीनं लिहिलेला मजकूर सध्या आवडीने वाचून तसे नागरिक करीत आहेत. औषधांची नावे आणि ती कशी घ्यायची हे लिहिल्यानंतर खालच्या बाजूला आजारातून बरे झाल्यावर एक झाड अवश्य लावा. म्हणजेच तुम्हाला व पुढील पिढीला भविष्यात ऑक्सिजनची कमी पडणार नाही, असा मजकूर भंगाळे यांनी लिहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अखेर नागरिकांना ऑक्सिजनचे महत्व पटले आहे. डॉक्टरांनी सुध्दा आता त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरून जनजागृतीपर संदेश देत आहे. डॉक्टरांनी सांगितले, तर प्रत्येक बाब रूग्ण एकतोच. त्यामुळे चिठ्ठीवर लिहिल्याप्रमाणे बरे झाल्यानंतर रूग्ण झाडे लावतील व त्याचा उपयोग स्वत:साठी व इतरांसाठी देखील होईल. तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी सुध्दा मदत होईल. डॉ. आशुतोष भंगाळे यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. तसेच त्यांच्या बॅचमधील सर्व डॉक्टरांनी जनजागृती करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती भंगाळे यांनी दिली.