जळगाव मनपा कर्मचाऱ्यांवर दगडांसह भाज्यांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:40 PM2020-06-24T12:40:30+5:302020-06-24T12:41:00+5:30

हॉकर्सने उगारला मनपा कर्मचाºयावर चाकू

Beat vegetables with stones on Jalgaon Municipal Corporation employees | जळगाव मनपा कर्मचाऱ्यांवर दगडांसह भाज्यांचा मारा

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांवर दगडांसह भाज्यांचा मारा

Next

जळगाव : शहरातील गिरणा टाकी परिसरात अनधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकावर हॉकर्सने दगडांसह कोबी व इतर फळ-भाज्यांव्दारे हल्ला करण्यासह धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. तसेच एका हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांवर चाकू उगारल्याने संतापलेल्या मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनीही हातात दंडुका घेत थेट ‘फिल्मी स्टाईल’ हॉकर्सला सज्जड दम दिला. मनपा कर्मचाºयांना हातही लावला तर तुरूंगाची हवा खावी लागेल असा इशारा दिला. यावादामुळे गिरणा टाकी परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत नोंद नव्हती.
मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून हॉकर्सवर होणारी कारवाईची मोहीम आता हॉकर्सने हातघाईवर आणली आहे. गेल्या महिनाभरात मनपा कर्मचाºयांवर हल्ला करण्याची तिसरी घटना घडली आहे. गिरणा टाकी परिसरात दररोज ७० ते ८० हॉकर्स आपले दुकाने थाटत असल्याबाबतची तक्रार काही नागरिकांनी केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी मनपाचे पथक गिरणा टाकी परिसरात कारवाईसाठी पोहचल्यानंतर पळापळ सुरु झाली. काही हॉकर्सचा माल मनपा कर्मचाºयांनी जप्त केल्यानंतर हॉकर्स व कर्मचाºयांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळात वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. वाद वाढतच गेल्याने ज्या हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला त्यापैकी काही हॉकर्सने मनपा कर्मचाºयांवर दगडफेक करायला सुरुवात केली. यात आणखीन हॉकर्स एकत्र आल्यानंतर दगडांसह कोबी व इतर फळभाज्यांचाही मारा मनपा कर्मचाºयांवर झाला.
मनपा कर्मचारी व हॉकर्समध्ये झालेल्या वादामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यात हॉकर्सने दगडफेक सुरु केल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाद वाढत असल्याने ग्राहकांनीही पळापळ सुरु केली.तसेच मिळेल त्या सुरक्षित जागेवर लपण्याचा प्रयत्न केला.उपायुक्त संतोष वाहुळे हे काही वेळात घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही फळ-भाज्यांचा मारा सुरुच राहिला.
चाकू उगारताच उपायुक्तांचा राग झाला अनावर
काही हॉकर्सने भाजी कापण्याचा चाकू मनपा कर्मचाºयांवर उगारल्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांचा राग अनावर झाला. उपायुक्तांनी दंडुका हातात घेवून फिल्मी स्टाईलने हॉकर्सचा मधोमध उभे राहिले. तसेच मनपा कर्मचाºयावर हल्ला केला तर याद राखा असा सज्जड दम हॉकर्सला दिला. काही वेळात पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे पथक पोहचल्यानंतर हॉकर्सची पळापळ सुरु झाली.
११ दुकाने सील, १५०हून अधिक हॉकर्सवर कारवाई...
मनपाकडून सुभाष चौक, गिरणा टाकी व इस्लामपुरा भागातील सुमारे १५० हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला. यासह गोलाणी मार्केट, बोहरा गल्ली, चौबे मार्केट भागातील ११ दुकाने मनपाकडून सील करण्यात आले. सोशल डिन्टिन्सिंगचे पालन न करणे व सम-विषम नियमांचे उल्लंघण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Beat vegetables with stones on Jalgaon Municipal Corporation employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव