यावल येथे मुलांनी केला मातीचा आकर्षक किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 08:13 PM2018-11-11T20:13:25+5:302018-11-11T20:14:12+5:30
दिवाळीमध्ये किल्ले उभारण्याची कला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना येथील दोन मुलांनी घराच्या आवारात आकर्षक किल्ला उभारला आहे.
Next
ठळक मुद्देदिवाळीत किल्ले उभारण्याची कला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना केलेला प्रयत्नगेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीमध्ये मुलांना लागला किल्ला उभारण्याचा छंद
यावल, जि.जळगाव : दिवाळीमध्ये किल्ले उभारण्याची कला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना येथील अॅड. नितीन चौधरी आमच्या प्रणव व ओम या दोन मुलांनी घराच्या आवारात आकर्षक किल्ला उभारला आहे.
किल्ला उभारण्याची पारंपरिक पद्धत वडील अॅड.नितीन चौधरी व आई राजश्री चौधरी यांनी मुलांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीमध्ये मुलांना किल्ला उभारण्याचा छंद झाला आहे.
याबाबत अॅड.नितीन चौधरी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा इतिहास व मुलांना आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना किल्ले बनवण्यात प्रोत्साहित केले.