भुसावळातील देखण्या बंगल्यांनी खुलवले सौंदर्य..!
By Admin | Published: April 18, 2017 05:54 PM2017-04-18T17:54:59+5:302017-04-18T17:54:59+5:30
भुसावळाच्या सौंदर्यात ब्रिटिश कालीन आणि वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना ठरलेल्या कौलारु बंगल्यांनी मोठीच भर घातली आहे.
ऑनलाईन लोकमत विशेष /पंढरीनाथ गवळी
भुसावळ, दि.18- रेल्वे, वीज,संरक्षण आणि कामगार अशी ओळख असलेल्या भुसावळाच्या सौंदर्यात ब्रिटिश कालीन आणि वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना ठरलेल्या कौलारु बंगल्यांनी मोठीच भर घातली आहे. देशाच्या सर्वच भागातून रेल्वेच्या सेवेत अधिकारीपदावर येथे येणा:या अधिका:यांना भुसावळातील हे रेल्वेचे बंगले भूरळ घालत आहेत.
साधारण 1860 मध्ये भुसावळात पहिल्या फलाटाची बांधणी झाली. तेव्हापासून येथे रेल्वेचे जाळे विणायला सुरुवात झाली.अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आली. यात डीआरएमसह त्यांचे समकक्ष व वरिष्ठ अधिकारी, रेल्वे ड्रायव्हर, गार्ड यांच्यासाठी खास कौलारु बंगल्यांची बांधणी करण्यात आली.
बंगल्यांच्या संख्येवरुन ओळख
बंगल्यांच्या संख्येवरुन शहरातील परिसराची ओळख निर्माण होईल, अशी रचना तत्कालीन प्रशासनाने केली आहे.
ताप्ती क्लब
ताप्ती क्लब परिसर हा शहरातील ‘सिव्हील लाईन’ म्हणून ओळखला जातो. एक ते तीन एकरातील प्रशस्त बंगले. हिरवीगार वनराई आणि चकाचक रस्ते असलेल्या या परिसरात भुसावळ विभागाचे प्रमुख म्हणून डीआरएम यांचे ‘खान्देश रेल निवासस्थान’ मुख्य रस्त्यावर आहे.हा बंगला तीन एकर इतक्या जागेवर आहे. तो बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना आहे. अद्ययावत यंत्र सामुग्रीने हा बंगला सज्ज आहे. 24 तास आरपीएफचे सशस्त्र जवान बंदोबस्तावर तैनात आहेत. उद्यान व बंगल्याची रचना परिसराचे सौंदर्य खुलविणारे आहे.
50 बंगले
या परिसरात विभागीय स्तरावरील अधिका:यांसाठी सुमारे 50 बंगले आहेत. शिवाय काही नवीन पद्धतीची निवासस्थाने आहेत.
खान्देश रेल निवासाच्या आधी एडीआरएम यांचा ‘ए-वन’ हा बंगला आहे. या नंतर अधिका:यांचे देखणे बंगले आहेत. तापी नदीच्या काठा र्पयत ताप्ती क्लब आहे. अधिका:यांसाठी ताप्ती क्लब आहे. या क्लबमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह महत्त्वाच्या बैठकी आदी होतात. याच भागात अधिका:यांसाठी विश्रामगृह आहे.
मिशन रोड
याच भागाला लागून मिशनरोड आहे. या ठिकाणीदेखील दुय्यम स्थानावरील अधिकारी, रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, रेल्वे हायस्कूलचे प्राचार्य, ङोडटीसी आणि एमओएच व पीओएच शेडमधील अधिकारी यांच्यासाठी आकर्षक बंगले आहेत.
आठ बंगले, दहा बंगले, बारा बंगले, 15 बंगले आणि चाळीस बंगले या नावाने भुसावळातील रेल्वे परिसराची ओळख होत आहे. बंगल्यांची संख्येनुसार तो परिसर ओळखला जातो. या सर्वच बंगल्यामुळे रेल्वे परिसरासह शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
मिशनरींचेही बंगले
रेल्वेच्या बंगल्यांप्रमाणेच भुसावळ शहरात पूर्वीचे ािश्नन मिशनरीचे काही बंगले आहेत.त्यात आता चर्च भरत आहेत. या बंगल्यांची रचनादेखील देखणी आहे.त्यामुळे बंगल्याचे शहर म्हणून हे शहर ओळखले.
तापी नदी काठारील ‘भूत बंगला’..!
ब्रिटिश रेल्वे अधिका:यांनी मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठकासांठी तापीनदीच्या काठावर सुमारे 100 वर्षापूर्वी बंगला बांधला आहे.जेव्हा बंगला बांधला गेला त्यावेळी या ठिकाणी प्रचंड जंगल होते. पार्टी व कार्यक्रमा शिवाय बंगला उघडला जात नव्हता. त्यामुळे लोक या बंगल्याला भूत बंगला म्हणून ओळखू लागले.आताही त्याची ओळख भूत बंगला अशीच आहे.आता या ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम होतात.
यादव 16 वे डीआरएम
भुसावळ रेल्वे विभागाचे 16 वे डीआरएम म्हणून यादव सेवेत आहेत. 1989 पासून भुसावळ येथे डीआरएम कार्यालय अस्तित्वात आले. त्या आधी या कार्यालयाला डी.एस.ऑफीस (विभागीय अधीक्षक) असे म्हटले जात होते. डीआरएम कार्यालयाची इमारत ही 100 वर्षापूर्वी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. ही इमारत म्हणजे रेल्वेची युद्व भूमीच असल्याचे मानले जात आहे.
भुसावळ रेल्वे विभागाला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळापासून भुसावळात रेल्वेचे महत्त्व आहे. तापी नदीचे या शहराला निसर्गाने दान दिले आहे. त्याचे महत्त्व ओळखून ब्रिटिशांनी देखील भुसावळ येथे रेल्वेची उभारणी केली. ही बाब अत्यंत महत्त्वाची व आपल्यासाठी अभिमानाची आहे. मी रेल्वे निवासात राहातो. रेल्वेच्या बंगल्यात राहण्याचे सुख अन्य घरांमध्ये राहण्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. ब्रिटिश काळातील रेल्वेचे हे बंगले वास्तुकलेचा नमुना आहे. या बंगल्याचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे.
-सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.