गोंडगाव ते वाडे रस्त्याचे साैंदर्य हिरवळीने बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:12+5:302021-07-18T04:12:12+5:30

यावेळी शिवाजी पाटील, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, सरपंच रजूबाई पाटील यांच्याहस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. या ...

The beauty of the road from Gondgaon to Wade will be green | गोंडगाव ते वाडे रस्त्याचे साैंदर्य हिरवळीने बहरणार

गोंडगाव ते वाडे रस्त्याचे साैंदर्य हिरवळीने बहरणार

Next

यावेळी शिवाजी पाटील, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, सरपंच रजूबाई पाटील यांच्याहस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत एकूण ४ हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षलागवडीचे काम लगेचच सुरू करण्यात आले. या वृक्षांचे संगोपनकामी शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येत आहे.

या वृक्ष लागवडीमुळे या रस्त्याच्या डेरेदार हिरवळीच्या झाडांनी पुढे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण तयार होण्यास मदत होईल. शेतकरी व नागरिकांनीही या वृक्षांचे संगोपन वा जतन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन गोंडगाव, बांबरुड प्र. ब., वाडे, नावरे आदी परिसरातील वृक्षप्रेमी मंडळीतून होत आहे. गोंडगाव ते बांबरुड प्र. ब., वाडे रस्त्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने शिवाजी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे मुकडदम विक्रम पाटील, साहेबराव गणबासे, सुनील मोरे, फकिरा मोरे, दीपक पाटील, लक्ष्मण गणबासे, पंडित मोरे आदी उपस्थित होते.

याच रस्त्यावर वाडे येथील नेताजी सुभाष ग्रामवाचनालयाचे संचालक अशोक परदेशी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वाडे येथील नेताजी सुभाष ग्रामवाचनालयाचे संचालक सुरेश पाटील, डिगंबर माळी, सामाजिक वनीकरण विभागाचे मुकडदम विक्रम पाटील हजर होते. तसेच वाडे ते बांबरुड प्र ब. गोंडगाव रस्त्यावर वृक्षलागवडप्रसंगी भास्कर भिल्ल, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक लागवड अधिकारी राजेंद्र बडगुजर, मुकडदम विक्रम पाटील उपस्थित होते.

Web Title: The beauty of the road from Gondgaon to Wade will be green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.