जळगाव जिल्हा रुग्णालयात केमोथेरेपीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:47 PM2018-07-12T12:47:07+5:302018-07-12T12:47:21+5:30

कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना

The beginning of chemotherapy at the Jalgaon District Hospital | जळगाव जिल्हा रुग्णालयात केमोथेरेपीला सुरुवात

जळगाव जिल्हा रुग्णालयात केमोथेरेपीला सुरुवात

googlenewsNext

जळगाव : कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरेपीची मोफत सुविधा आता जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली असून ११ जुलै रोजी सकाळी त्याचा शुभारंभ झाला.
पूर्वी संसर्गजन्य आजाराचे प्रमाण अधिक होते, मात्र त्यावर उपाययोजना झाल्या असल्या तरी आता बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्ग आजारांचे प्रमाण वाढत आहे. यात सर्वाधिक प्रमाण कर्करोगाचे असून त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १० जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामध्ये जळगाव जिल्हा रुग्णालयात ११ जुलै रोजी या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. अतिदक्षता विभागात सुरू झालेल्या या केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार, गौतम सोनवणे तसेच परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The beginning of chemotherapy at the Jalgaon District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.