आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला उत्साहात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:39 AM2019-03-15T00:39:30+5:302019-03-15T00:39:45+5:30

वैभवशाली संस्कृतीचे दर्शन

Beginning with the enthusiasm of the terrible market that exhibits tribal culture | आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला उत्साहात सुरुवात

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला उत्साहात सुरुवात

Next

धानोरा, ता. चोपडा : आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाºया भोंगºया बाजाराला गुरुवारपासून सुरुवात झाली असून यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.धानोरा येथे बाजारात आदिवासी पावरा समाजाने आपल्या आवडत्या भोंगाºया सणाचा मनमुराद आनंद लुटला.
चोपडा-यावल रस्त्यावरील मैदानावर भरलेल्या या बाजारात आयोजित करण्यात आला होता. दिवसभर येथे यात्रेचे स्वरूप आलेले होते. यावेळी ढोल घेवून समाजबांधव आले होते. विविध वस्तू खरेदीसाठी लगबग सुरु होती.
दºयाखोºयातून, वाडयावस्त्यांहून पायी, बैलगाडी, वाहने घेवून धानोरा बाजारात सकाळपासून आदिवासी बांधव दाखल झाले. आकर्षक वेशभुषा करून तरुण -तरुणीसह आबाल वृध्द ढोल ताशांच्या तालावर व बासरीच्या मधूर सुरांनी आणि पायातील घुंघरुच्या तालावर धुंद होवून बेभान जल्लोषात उत्साहाने बाजाराचा आनंद घेतला.
आदिवासी महिलाकडे जेवढे दागिने असतात तेवढे त्या या सणाला परिधान करून भोंगºयामध्ये नृत्य करीत तल्लीन झाल्याचे दिसून आले. त्यांचा पेहराव नवे कपडे कमरेला चांदीचा करदोडा, बाजूबंध, वाकला, पिजण्या असा महिलांचा पेहराव होता तर धोतर, टोपी, कुडता, कोट, रंगीबेरंगी चष्मे असा पुरुषांनी पेहराव करून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले.
गावांमध्ये भोंगºया बाजारमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. बाजारात अनेकांनी ढोल घेवून आले होते. तसेच विविध वस्तू खरेदीसाठी लगबग दिसून आली. भोंगºयानिमित्त आलेल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना भोंगºयाची मिठाई म्हणून हार, कंगण, गोडशेव, फुटाणे, जिलेबी आदी खाद्य पदार्थ भेट म्हणून देण्यात आले. मुलींनी आपल्या माहेरी आलेल्या नातेवाईकांना जेवण म्हणून तुपामध्ये शेवाया, गुळ असे जेवण दिले.

Web Title: Beginning with the enthusiasm of the terrible market that exhibits tribal culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव