भूमिगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:27+5:302021-02-11T04:18:27+5:30

चेंबरने पेलला १७ टनाचा भार : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात भूमिगत गटारींचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर ...

Beginning of the load test of the underground gutter chamber | भूमिगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरुवात

भूमिगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरुवात

Next

चेंबरने पेलला १७ टनाचा भार :

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात भूमिगत गटारींचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहेत. भूमिगत गटारींच्या चेंबरचे काम योग्य नसून अनेक गैरसमज नागरिकांच्या मनात आहे. नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी बुधवारपासून चेंबरची लोड टेस्ट सुरू करण्यात आली. महापौर सभारती सोनवणे यांच्या उपस्थितीत चेंबरवर १७ टन वजनाचा भार तपासून पाहण्यात आला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, भूमिगत गटारीच्या कामाचे मक्तेदार प्रतिनिधी आणि अभियंता उपस्थित होते.

भूमिगत गटारीसाठी गल्लोगल्ली चेंबर तयार करण्यात आले आहे. गल्लीतून शक्यतो अवजड वाहने जात नाही. तरीही चेंबरने १७ टन क्षमतेचा भार पेलला आहे. १७ टन क्षमता म्हणजेच चेंबरहून ६८ टन वजनाचे वाहन जाऊ शकते. आजपर्यंत १० चेंबरची तपासणी पूर्ण झाली असून दररोज ५ चेंबर तपासले जाणार आहे.

Web Title: Beginning of the load test of the underground gutter chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.