अमळनेर येथे दोन दिवसीय युवा नाट्य-साहित्य संमेलनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:47 PM2018-09-29T12:47:19+5:302018-09-29T12:49:20+5:30

युवा रंग यात्रा

The beginning of youth drama | अमळनेर येथे दोन दिवसीय युवा नाट्य-साहित्य संमेलनास सुरुवात

अमळनेर येथे दोन दिवसीय युवा नाट्य-साहित्य संमेलनास सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देअहिराणी भाषेत विनोदी बतावणीछत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह रांगोळी, पोस्टर्स व आकर्षक कलाकृतींनी सजविण्यात आले

अमळनेर, जि. जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेच्यावतीने अमळनेरात दोन दिवसीय युवा नाट्य- साहित्य संमेलनास शनिवारपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर सकाळी युवा रंग यात्रा काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह रांगोळी, पोस्टर्स व आकर्षक कलाकृतींनी सजविण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्राचार्य तानसेन जगताप , संमेलनाचे स्वागताध्यक्ष डिंगबर महाले, संदीप घोरपडे, रमेश पवार, प्रा.रमेश माने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर येथील शिवाजी नाट्यगृहाच्या परिसराला साने गुरुजी साहित्य नाट्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. यात दर्शनी भागात नाट्य आणि साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचे फोटो लावण्यात आले आहेत. जेणे करून अमळनेरकरांना या दिगग्ज कलाकारांची ओळख व्हावी. रंगमंच ग्रीक आणि भारतीय रंगभूमीची सांगड घालून तयार करण्यात आला आहे. यात साहित्य आणि नाट्य क्षेत्र दाखवणा-या मशाली आणि साहित्यचे प्रतीक मोराचे खांब उभारण्यात आले आहेत. नमन नटवरा या नाट्यगीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला नांदीने सुरुवात झाली. त्या पाठोपाठ अहिराणी भाषेत विनोदी बतावणी सादर करण्यात आली.

Web Title: The beginning of youth drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.